तु निवृत्ती घेण्याच्या चर्चा आहेत?, जे काही सुरु आहे त्या अफवांना हवा… रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर

Rohit Sharma on Retirement : भारतानं न्यूझीलंडला 4 विकेटनं पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली होती. (Rohit Sharma) त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा तसा निर्णय घेऊ शकतो अशा अफवांना चर्चा आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद संपवताना रोहितनं निवृत्तीवर मोठं भाष्य केलं.
रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यानंतर रोहितनं पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषद संपवताना रोहित शर्मानं निवृत्तीबाबत आवर्जून भाष्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही, अफवांना हवा देऊ नका, असं रोहित म्हणाला. रोहित शर्मानं फायनलमध्ये 76 धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. वनडे मध्ये चांगली कामगिरी करत असल्यानं बरेचसे खेळाडू वनडे वर्ल्ड कपच्याच टीममधील होते, असं रोहित शर्मा म्हणाला.
टीम इंडिया चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
रोहितनं केएल राहुल संदर्भात देखील भाष्य केलं. रोहित शर्मानं केएल राहुल फलंदाजी करताना किती संयमी असतो हे पाहिलं आहे. त्याच्या संयमाचा फायदा करुन घेण्यासाठी त्याला मधल्या फळीत स्थान दिलं. उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीतील लढतील त्याची खेळी महत्त्वाची असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. केएल राहुलच्या कामगिरीसाठी आनंदी असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
मी आज देखील कोणती वेगळी गोष्ट केली नाही. गेल्या तीन ते चार सामन्यात जे करत आलोय तेच केलं. पॉवरप्लेमध्ये धावा करणं महत्त्वाचं आहे हे माहिती आहे. पॉवरप्लेनंतर धावा करणं आव्हानात्मक असतं हे माहिती होतं, त्यामुळं सुरुवातीलाच आक्रमक खेळणं गरजेचं असतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तर, भारतानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.