टीम इंडिया ‘चॅम्पियन’, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

  • Written By: Published:
टीम इंडिया ‘चॅम्पियन’, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

India beat New Zealand won champions Trophy 2025 : फिरकी गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, कर्णधार रोहित शर्माची स्फोटक फलंदाजी व मध्यल्या फळीतील फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा चार विकेटसने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. 25 वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारताला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले होती. याचा बदलाही भारताने घेतला. न्यूझीलंडने दिलेले 252 धावांचे लक्ष्य भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 49 ओव्हरमध्ये गाठले. भारताकडून रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. श्रेयस अय्यरनेही 48 धावांची महत्त्वाची खेळी केली. न्यूझीलंडकड़ून मिचेल सॅंटनर आणि मायकल ब्रासवेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत सात बाद 251 धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडकडून डेरेल मिचेलने 63 आणि मायकल ब्रेसवेलने नाबाद 53 धावांची खेळी केली. भारताकडून फिरकी गोलंदाज भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेट्ससाठी 105 धावांची मजबूत भागिदारी केली. पण कर्णधार मायकल सॅंटनरने गिल झेलबाद करत भारताला पहिला झटका दिला. भारत मजबूत स्थितीत असताना आणि विजयाकडे वाटचाल करत असताना लगेच पंधरा धावांत दोन झटके बसले. विराट कोहली ब्रासवेलने एका धावेवर बाद केले. तर रोहित शर्माच्या रुपात तिसऱ्या झटका बसला. रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने चौथ्या विकेट्साठी 59 धावांची भागिदारी केली. परंतु अय्यर आणि अक्षय पटेल हे फटकेबाजी करण्याचा नादात बाद झाले. श्रेयस अय्यरने 48 आणि अक्षर पटेलने 29 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने सहाव्या विकेट्ससाठी चांगला खेळ करत विजय मिळवून दिला.


डिरेल मिचेल आणि मायकल ब्रासेलमुळे न्यूझीलंडच्या सन्मानजनक धावसंख्या

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर विल यंग आणि रचिन रवींद्रने सावध सुरूवात केली. परंतु त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत यंग अडकला. यंग एलबीडब्लू झाला. त्याने 15 धावा केल्या. 57 धावांवर न्यूझीलंडची एक विकेट गेली होती. त्यानंतर मात्र न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. रचिन रवींद्रला 37 धावांवर कुलदीप यादवने क्लिनबोल्ड केले. त्यानंतर केन विल्यमसन मोठा अडथळा कुलदीपने दूर केला. विल्यमसनने 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर डारेल मिचेल आणि टॉम लॅथमने एक छोटी भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु टॉमला रवींद्र जडेजाने एलबीडब्लू करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. एका बाजूने डॅरेल मिचने डाव सांभाळला. त्याला ग्लेन फिलिप्स हा साथ देत होता. पण वरुणने फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. न्यूझीलंडच्या पाच विकेट्स 165 धावांवर गेल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या दोघांनी दोन विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. 40 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पाच विकेट्सच्या बदल्यात 172 धावा केल्या होत्या. पाच विकेट्स गमविल्यानंतर न्यूझीलंडचा धावसंख्या एकदम संथ झाली. डिरेल मिचेल व मायकल ब्रेसवेलने सावध खेळत धावसंख्या पुढे नेली. पण डिरेल मिचेल 63 धावांवर बाद झाला. त्याने 101 चेंडूत तीन चौकार मारत संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी केली. त्याला मोहम्मद शमीने झेलबाद केले. तर मायकल ब्रेसवेलने नाबाद 53 धावांची खेळी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube