ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Steve Smith : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने (INDVsAUS) पराभव केला आहे. या परभावानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा निर्णय घेत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती (Steve Smith Retirement)घेण्याची घोषणा केली आहे. आता तो ऑस्ट्रेलियासाठी फक्त कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. याच बरोबर त्याची इच्छा 2028 च्या ऑलिंपिकमध्येही देशासाठी खेळण्याची आहे.
याबाबत माहिती देत हा एक उत्तम प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला आहे, असं स्मिथने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2027 च्या विश्वचषकाची टीम तयार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. असं देखील स्मिथ म्हणाला. याच बरोबर कसोटी क्रिकेट हे प्राधान्य राहिले आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि मायदेशात होणाऱ्या एशेजची वाट पाहत आहे. असं देखील या प्रेस रिलीजमध्ये स्मिथने म्हटले आहे.
Australia’s Steve Smith retires from ODI cricket. pic.twitter.com/q7HnGTfhlZ
— ANI (@ANI) March 5, 2025
स्मिथने 19 फेब्रुवारी 2010 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि 4 मार्च 2025 रोजी भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. या 15 वर्षांत त्याने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याची फिरकी गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. तर आपल्या शेवटच्या सामन्यात 96 चेंडूत 73 धावांची खेळी केली.
‘आरडी’ चित्रपटातलं धमाल “वढ पाचची” गाणं लाँच, चित्रपट 21 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 169 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 153 डावांमध्ये त्याने 5727 धावा केल्या आहे. एकदिवसीयमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 164 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी43.06 आहे, तर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 87.13 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके आणि 34अर्धशतके आहेत.