SL vs AUS:  स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, मोडला रिकी पॉन्टिंगचा खास विक्रम 

  • Written By: Published:
SL vs AUS:  स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, मोडला रिकी पॉन्टिंगचा खास विक्रम 

SL vs AUS:  श्रालंकेविरूद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (SL vs AUS) स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) शानदार कामगिरी करत आशियामध्ये ऑस्ट्रेलियाकडून (Australia) कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने महान फंलदाज रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) मागे टाकले आहे. तर दुसरीकडे या सामन्यात स्मिथने त्याचे 36 वे कसोटी शतक झळकावले. कसोटीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि जो रूट (Joe Root) यांच्यासोबत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे तो प्रत्येक चांगल्या खेळीसह विक्रम मोडत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवण्यात आला आहे. तो आशियामध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. आशियामध्ये फलंदाजी करताना पॉन्टिंगने एकूण 1889 धावा केल्या. या यादीत अॅलन बॉर्डर 1799 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 141 धावा करणारा स्मिथ दुसऱ्या सामन्यातही चांगली फलंदाजी करत 36 वे कसोटी शतक झळकावले आहे. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन लवकर बाद झाल्यानंतर, स्मिथने उस्मान ख्वाजासोबत मिळून ऑस्ट्रेलियन डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. ख्वाजा बाद झाल्यानंतर स्मिथने चौथ्या विकेटसाठी अ‍ॅलेक्स कॅरीसोबत शतकी भागीदारी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube