Ashes 2025 : स्टार्कनंतर ट्रॅव्हिस हेडचा कहर; ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी मारली बाजी

Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा

  • Written By: Published:
Ashes 2025

Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा अवघ्या दोन दिवसात पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेले 205 धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. हेडने 83 चेंडूत 123 धावांची खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दोन दिवसांत विजय

ऑस्ट्रेलियाने (Australia) पर्थमध्ये अवघ्या दोन दिवसांत इंग्लंडचा पराभव केला. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि जेक वेदरल्ड (Jake Weatherald) यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. वेदरल्ड 23 धावांवर बाद झाला. हेडने अवघ्या 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर 69 चेंडूत शतक पूर्ण केले. 83 चेंडूंच्या त्याच्या खेळीत हेडने 16 चौकार आणि चार षटकार ठोकून 123 धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मार्नस लाबुशेननेही 49 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली.

राजन पाटलांचं नाव अमेरिकेपर्यंत गेले; जयकुमार गोरेंकडून कौतुक अन् राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

स्टार्क आणि बोलंडने कहर केला

गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मिचेल स्टार्क आणि बोलंडने शानदार कामगिरी केली. स्टार्कने सामन्यात एकूण 10 विकेट घेतले, 35 वर्षांत हा पराक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तर दुसऱ्या डावात बोलँड आणि स्टार्कने मिळून सात विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 164 धावांवर बाद झाला. संघाकडून गस अ‍ॅटकिन्सनने सर्वाधिक 37 धावा केल्या, तर ऑली पोपने 33 धावा केल्या. दुसऱ्या डावात बोलँडने 3 विकेट घेतले.

follow us