राजन पाटलांचं नाव अमेरिकेपर्यंत गेले; जयकुमार गोरेंकडून कौतुक अन् राष्ट्रवादी काँग्रेसला टोला
Jayakumar Gore On Rajan Patil : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष सध्या जास्तीत जास्त जागा
Jayakumar Gore On Rajan Patil : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष सध्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे गेल्या 10 दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनगर नगरपरिषद आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाची चर्चा जोराने सुरु आहे. अनगर नगरपरिषदेत राजन पाटील यांची सुन प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर अनगरमधील राजकारणात अनेक आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला होता मात्र उमेदवाराचे अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर आता अनगरमध्ये (Ungar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) नेते आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.
प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हन दिले होते तर या आव्हानाला उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रत्युत्तर देत पाटलाला माफी नाही, आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार असं म्हटले आहे. तर आता ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका करत माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे कौतुक करत राजन पाटील यांचे नाव दिल्ली, अमेरिकेत गेले आणि पिवळं दिसतं ते सोने नसतं, बेन्टेक्स असतं असं म्हणत उमेश पाटील यांच्यावर टीका केली आहे.
T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत- पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना
महाराष्ट्र ते दिल्ली आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत राजन पाटील यांचे नावं झालं आहे. अमेरिकेतले लोकही म्हणतात, अनगर कुठे आहे? आणि राजन पाटील कोण आहेत? असं एका सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
यावर बोलताना राजन पाटील म्हणाले की, किती शिव्या खातोय, यावर जयकुमार गोरे म्हणाले पाटील जे शिव्या खातात तेच मोठे होतात. मोहोळ तालुक्यातील अनेक पिपाण्या वाजतात पण त्या पिपाणीत काही दम नाही. बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सोनं नसतं ते बेन्टेक्स असतं असं म्हणत जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना टोला लावला. तर आता या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर मिळणार हे पाहावे लागणार आहे.
