मुंबईत अजितदादांची कोंडी ? भाजपकडून पुन्हा नवाब मलिकांना थेट विरोध !
Ashish Shelar : मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही हे वरिष्ठांना सांगितले आहे. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
Ashish Shelar On Nawab Malik : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीला सुरुंग लागलाय. कुठे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, तर कुठे भाजपविरुद्ध शिवसेना, कुठे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. पण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) व भाजप पक्षात वाद सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिलीय. त्याला आता भाजपने विरोध सुरू केलाय. त्याला मंत्री व भाजपचे मुंबईत निवडणूक प्रभारी आशिष शेलारांनी (Ashish Shelar) थेट विरोध केलाय. (Ashish Shelar On Nawab Malik bjp ajit pawar ncp mumbai corportaion)
नवाब मलिकांना राष्ट्रवादीत घेण्यापासून विरोध
माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीप्रकरणात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा नवाब मलिक यांच्यावर आहे. त्या प्रकरणात ते तुरुंगात होते. सध्या ते जामिनावर सुटलेले आहे. नवाब मलिक यांना भाजपने कायम विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपविरोध होता. या विरोधानंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले होते. परंतु ते मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यानंतर अजित पवारांनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर दिली आहे. त्याला आता आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शविला.
तर मुंबईत महानगरपालिकेत युती अशक्य-आशिष शेलार
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर मुंबई महापालिकेत युती अशक्य आहे, अशी परखड भूमिका मंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतलीय. मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही हे वरिष्ठांना सांगितले आहे. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महायुतीमध्ये नसावी हीच आमची भूमिका असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबईत नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा ?
मुंबईमध्ये अजित पवार यांना मोठा जनाधार नाही. नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी असेल तर काही मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ शकतात. त्यासाठी अजित पवार यांनी नवाब मलिकांवर निवडणुकीची जबाबदारी दिलीय. भाजपचा विरोधामुळे नवाब मलिकांची जबाबदारी काठून घेतल्यास मुस्लिम मतदार हे राष्ट्रवादीपासून दूर जातील, अशी एक शक्यता आहे. तर नवाब मलिकांवर जबाबदारी काय ठेवली तर भाजप नाराज, अशा दुहेरी कोंडीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सापडले आहेत.
