The Ashes 2025 पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला; मोडला तब्बल 100 वर्षांचा रेकॉर्ड

The Ashes 2025 :  आजपासून कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी लढाई द अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरु झाली आहे.

  • Written By: Published:
The Ashes 2025

The Ashes 2025 :  आजपासून कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी लढाई द अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरु झाली आहे. पाच कसोटी मालिकेतील पहिला सामन्याच्या पहिल्या दिवशी आस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.

पर्थमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 19 विकेट पडल्या आहे. सुरुवातीला मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) शानदार गोलंदाजी करत 58 धावांत 7 विकेट घेत इंग्लंडचा (England) संघ 172 धावांवर आटोपला त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) पाच विकेट घेत या सामन्यात इंग्लंडला कमबॅक करुन दिले.

अ‍ॅशेस मालिकेच्या (The Ashes 2025) इतिहासात आज पहिल्यांदाच पहिल्या दिवशी 19 विकेट्स पडल्या आहे. यापूर्वी 1888 मध्ये सिडनी येथे झालेल्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी आणि 1896 मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या 3 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दिवशी 18 विकेट्स पडल्या होत्या आणि ट्रेंट ब्रिज येथे 2001 मध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशी 17 विकेट पडल्या होत्या. तर दुसरीकडे आज आणखी एक रेकॉर्ड बनला आहे. या मालिकेच्या इतिहासात आतापर्यंत, कोणत्याही संघाने त्यांच्या पहिल्या डावात खाते उघडल्याशिवाय एकही विकेट गमावली नव्हती पण आज असं झाले नाही. इंग्लंडकडून जॅक क्रॉली सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला तर ऑस्ट्रेलियाकडून (Australia) जेक वेदरल्ड देखील पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 172 धावांवर आटोपला तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 123 धावांवर 9 विकेट गमावल्या आहे. सध्या ऑस्ट्रेलिया इंग्लंडपेक्षा 49 धावांनी मागे आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा संघाचा उपकर्णधार हॅरी ब्रूकने केल्या त्याने शानदार खेळी करत 61 चेंडूत 52 धावांची खेळी करत या मालिकेतील पहिला अर्धशतक ठोकला.

तुमची प्रायव्हसी धोक्यात?; झोमॅटोच्या एका निर्णयामुळे का फुटलंय वादाला तोंड…

तर मिशेल स्टार्कने 58 धावांत 7 विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर नेले. तर दुसरीकडे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून दिवसाचा खेळ संपेपर्यंत अ‍ॅलेक्स कॅरीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 26 चेंडूत 26 धावा केल्या. तर सध्या नॅथन लायन 3 धावांवर आणि ब्रेंडन डॉगेट शुन्यवर खेळत आहे.

follow us