डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..

Donald Trump Reciprocal Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या (Donald Tariff) निर्णयावर माघार घेत 75 पेक्षा जास्त देशांना दिलासा दिला. ट्रम्प प्रशासनाने रेसिप्रोकल टॅरिफ (Reciprocal Tariff) लागू करण्याचा निर्णय तीन महिन्यासांठी स्थगित केला आहे. यातून फक्त चीनला वगळण्यात (China) आले आहे. चीनला कोणताही दिलासा मिळालेला नाही. चीनवर अमेरिकेने तब्बल 125 टक्के टॅरिफ लादला आहे.
या निर्णयानंतर जगातील शेअर बाजारांत मोठी (Share Market) तेजी दिसून आली. ट्रम्प यांच्या या यू टर्नमुळे जगभरातील बाजारांत तेजी होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक यू टर्न घेण्याचे कारण काय? ट्रम्प प्रशासनाने निर्णयावरून माघार का घेतली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. खरंतर यामागे कारणही आहे. आज याबाबत सविस्तर माहिती घेऊ या..
या निर्णयाबाबत माहिती देताना ट्रम्प म्हणाले की आम्ही 90 दिवसांची सवलत देत आहोत. पण या काळात 10 टक्के रेसिप्रोकल टॅक्स अधिकृत केला आहे. याआधी 3 एप्रिल रोजी लिबरेशन डे निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली होती. हा निर्णय 9 एप्रिलपासून लागू झाला होता. सर्व वस्तूंवर 10 टक्क्यांचा बेसलाइन रेसिप्रोकल टॅरिफ लागू राहील. पण आता अमेरिकेने 90 दिवसांसाठी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यामागे अमेरिकेची एक वेगळीच रणनीती आहे.
चीन बाबतीत परिस्थिती काय
सुरूवातीच्या टप्प्यात अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के टॅरिफ आकाराला होता. यानंतर 3 एप्रिल रोजी यात आणखी 34 टक्के टॅरिफ वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी 54 टक्के टॅक्स वाढवून एकूण 104 टक्के टॅरिफ केला. नंतर पुन्हा 9 एप्रिल रोजी चीनला आणखी एक दणका देत टॅरिफ थेट 125 टक्क्यांवर नेला. तर दुसरीकडे चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत 84 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. आता या दोन्ही देशांत ट्रेड वॉर सुरू झाले आहे.
स्टील, अल्युमिनियम, ऑटो इम्पोर्ट्सवर आधीच वेगळा टॅरिफ आहे. कॅनडा आणि मेक्सिकोवरही 10 टक्के किंवा 25 टक्के टॅरिफ लागू राहील. फार्मा सेक्टरला कोणताही दिलासा मिळालेला नाही. औषधांवर टॅरिफ लागू राहील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
टॅरिफ स्थगित करण्याचे कारण काय
मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदार आणि उद्योजकांचा ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यांनी एक तर हा निर्णय मागे घ्यावा किंवा यात कपात तरी करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती. ट्रम्प यांनी सांगितले की हा निर्णय ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेन्सेट आणि कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लटनिक यांच्याशी चर्चा करून घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगभरातील बाजारांवर विपरीत परिणाम झाला होता. मंदीची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे मला वाटलं की लोक मला जास्तच घाबरत आहेत. म्हणून थोडे मागे येण्याचा निर्णय घेतला असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेकडून चीनवर 104 टक्के टॅरिफ! भारताला तोटा होणार की फायदा? जाणून घ्या…
कोणत्या देशांना मिळाला दिलासा
ट्रम्प म्हणाले 75 पेक्षा जास्त देशांनी त्यांच्या इशाऱ्यावर काहीच उत्तर दिले नाही. तसेच पलटवार देखील केला नाही. त्यामुळे या देशांना दिलासा दिला आहे. स्कॉट बेन्सेट म्हणाले की आगामी काळात व्हिएतनाम, जपान, भारत आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) अधिकाऱ्यांशी चर्चा करू. ही रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक डावपेचांचा भाग मानली जात आहे. यामध्ये अमेरिका चीनवर दबाव टाकून उर्वरित देशांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.