अजितदादा जय पवारांच्या लग्नात बहरिनला व्यस्त असताना पवारांनी पुण्यासाठी घेतला मोठा निर्णय
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन प्रशांत जगताप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जय पवार यांच्या लग्नानिमित्त बहरिनमध्ये आहेत. एकीकडे मुलाचे लग्न असल्याने दादांच्या परिवारात आनंदाचे वातावरण असताना मात्र, शरद पवारांनी दादांच्या अनुपस्थितीत पुण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. ते पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते. पवारांच्या या निर्णयामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
पवारांच्या भेटीत काय-काय घडलं?
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले होते. मात्र, पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढायचं असल्याची भूमिका पवारांनी जाहीर केली आहे.
जगतापांनी दिला होता राजीनाम्याचा इशारा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांनी घेतला होता, त्यानंतर आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली यावेळी पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे पवारांनी सांगितल्याचे जगतापांनी सांगितले.
भेटीदरम्यान पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा पवारांसमोरर मांडल्याचेही यावेळी जगतापांनी सांगितले. त्यानंतर पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणूनच लढू. शशिकांत शिंदे यांच्याशीदेखील पवार बोलल्याचे जगताप म्हणाले.
प्रशांत जगताप यांनी मांडला पुणे शहराचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखजोखा#Sharadpawar #ncp #Ajitpawar #election2025@PawarSpeaks @prashantjagtapn @supriya_sule @RRPSpeaks @shindespeaks pic.twitter.com/NWdWIPpFG1
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 6, 2025
