आम्ही जगाला दीडशे वेळा उद्ध्वस्त करू… ट्रम्प यांची जगाला धडकी भरवणारी धमकी

Donald Trump यांनी पुन्हा एकदा जगाला धक्का देणारा दावा केला की, आमच्याकडे इतकी अण्वस्त्र शक्ती आहे, आम्ही जगाला दीडशे वेळा उद्ध्वस्त करू शकतो

Donald Trump (10)

We will destroy the world 150 times… Trump’s terrifying threat to the world : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला धक्का देणारा दावा केला आहे. त्यामुळे आता एकीकडे जगावर टॅरिफ लादून जग वेठीस धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पबद्दल पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांचं हे विधान नेमकं काय? जाणून घेऊ…

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की,रशिया,चीन आणि उत्तर कोरिया हे राष्ट्र वारंवार अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे यामध्ये अमेरिका देखील मागे राहू शकत नाही. हे विधान सीबीएस न्यूजच्या लोकप्रिय शो सिक्सटीन मिनिट्स यामध्ये इंटरव्यू देताना केला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; मराठी चित्रपट सृष्टीची खाष्ट आणि कजाग सासू हरपली

ट्रम्प म्हणाले आमच्याकडे इतकी अण्वस्त्र शक्ती आहे की,आम्ही जगाला दीडशे वेळा उद्ध्वस्त करू शकतो.रशिया, चीन यांच्याकडे देखील मोठी अण्वस्त्र शक्ती आहे.मात्र अमेरिका एकटा असं देश आहे.जो अण्वस्त्र चाचणी करत नाही.त्यामुळे हे चालणार नाही.अमेरिका देखील संयम राखण्याची नीती अवलंबू शकत नाही.

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरची सीडी पळवणारे चोर सापडले; कोण होते ते अन् काय आहे सीडीत?

अमेरिका जर अशा प्रकारे अण्वस्त्र चाचण्या करण्यामध्ये मागे राहिला.तर रणनीती संतुलन बिघडेल त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे की,त्यांनी त्यांच्या संरक्षण विभागाला तात्काळ अण्वस्त्र चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

follow us