ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; मराठी चित्रपट सृष्टीची खाष्ट आणि कजाग सासू हरपली
Daya Dongre मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खाष्ट आणि कजाग सासू म्हणून कणखर भूमिका बजावणाऱ्या दया डोंगरे यांचं निधन झालं आहे.
Veteran Marathi actress Daya Dongre passes away : मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खाष्ट आणि कजाग सासू म्हणून कणखर भूमिका बजावणाऱ्या दया डोंगरे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरची सीडी पळवणारे चोर सापडले; कोण होते ते अन् काय आहे सीडीत?
दया डोंगरे यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर दूरदर्शनवर गाजलेल्या गजरा या मालिकेमधून त्या घराघरात पोहोचल्या आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं. मराठीतील खट्या सासू नाठाळ सून,नवरी मिळे नवऱ्याला,त्याचबरोबर मराठी सह हिंदीतही त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारल्या. नकाब,लालची आणि कुलदीपक यासारख्या चित्रपटात त्यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळाल्या.
पारंपारिक आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाप! टी सिरीजचं मंत्रमुग्ध करणारं भजन ‘शंभू’
तर चार दिवस सासूचे या लोकप्रिय मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलं.त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी साकारलेली खाष्ट आणि कजाग सासू विशेष गाजली. मराठी कलासृष्टीला मोठं योगदान देणा कलाकार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘वस्त्रहरण’कार गंगाराम गव्हाणकर यांचे निधन
या अगोदर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार माननीय गंगाराम गव्हाणकर यांचं सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी रात्र 10 वाजून 40 मिनिटांनी दुर्दैवी निधन झाले. त्यांनी दहिसर पूर्व येथील एका खाजगीर रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यानंतर तीन मुलं, सुना आणि नातवंडाचा परिवार आहे.
