मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरची सीडी पळवणारे चोर सापडले; कोण होते ते अन् काय आहे सीडीत?
या घटनेनंतर जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता.
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली. चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि सीडी चोरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत. खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
