शशांक केतकरचा निर्माता देवस्थळींवर थेट निशाणा; चिन्मयी सुमित यांचाही उघड पाठिंबा
Shashank Ketkar ने निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर थेट निशाणा साधला चिन्मयी सुमित यांनी शशांक केतकरच्या या भूमिकेला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
Shashank Ketkar Criticize to Producer Mandar Devsthali Cheenmayi Sumit Also Support : अलीकडे अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यामागचं कारण म्हणजे त्याने काल सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट. या पोस्टमधून शशांकने निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर थेट निशाणा साधला असून, ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Video : ‘मातोश्री’त दोन किल्ले सरेंडर केल्याचे सांगणाऱ्या संतोष धुरींना राज ठाकरेंनी हाकललं…
या व्हिडिओमध्ये शशांक केतकरने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “हा व्हिडिओही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल केला जाईल, याची मला पूर्ण जाणीव आहे. काही जण म्हणतील—आता पुन्हा मनोरंजन सुरू झालं, तर काहींचं मत असेल की हा नेहमीच तक्रारी करत राहतो. काहीजण मला शांत बसत नाही असंही म्हणतील. पण मी या इंडस्ट्रीत काम करतो, हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझी सेवा प्रामाणिकपणे देतो,” असं शशांकने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
भाजपचा मास्टरस्ट्रोक! सर्वसाधारण वॉर्डात ‘लाडकी बहीण’ शुभ्रा तांबोळींना उतरवले
शशांकने यावेळी आपल्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचाही उल्लेख केला असून, आपल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं तो सांगतो. याचसोबत, शशांकने निर्माता मंदार देवस्थळी यांच्याशी झालेल्या संभाषणाचे व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट्स देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Video : आमदार योगेश टिळेकरांमुळे माझी उमेदवारी कापली; संदीप लोणकर यांचा थेट आरोप
या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी शशांक केतकरच्या या भूमिकेला उघडपणे पाठिंबा दिला आहे. याआधीही चिन्मयी सुमित यांनी मराठी कलाकारांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. मराठी कलाकार, मराठी भाषा तसेच चित्रपट व मालिकासृष्टीतील बॅकस्टेज आर्टिस्ट्स यांच्या प्रश्नांवर त्या नेहमीच ठामपणे भूमिका मांडताना दिसतात.
चिन्मयी सुमित यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शशांक केतकरच्या मोहिमेला पाठिंबा जाहीर करत, या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांच्या या समर्थनामुळे शशांक केतकरच्या वक्तव्याला आणखी बळ मिळालं असून, या संपूर्ण प्रकरणाला आता नेमकं कोणतं वळण मिळणार, याकडे मराठी मनोरंजन विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या अभिनेत्री चिन्मयी सुमित?
अस्ताद सुनिता प्रमोद काळे शशांक केतकर ह्यांनी एकत्र येऊ या का? म्हणून मोहिम हाती घेतली आहे. त्यावरच्या कमेंट्स वाचत होते. ‘अमुक एका दिग्दर्शकाने ह्यांना नावलौकिक मिळवून दिला. आता त्याची परिस्थिती नाही तर ह्यांनी ‘ त्याची मदत केली ‘पाहिजे. ” मराठी कलाकार माजुरडे असतात कुणीही कुणाला नावलौकिक ‘मिळवून देत नाही. आमच्या क्षेत्रात टीम वर्क असतं. कुणा एकामुळे यश नाही मिळत. हक्काचे आणि कष्टाचे पैसे प्रत्येकाला वेळेवर मिळालेच पाहिजेत. ज्याचं जळतं त्याला कळतं.
नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच : आ. संग्राम जगताप
उद्या एखाद्या बँक कर्मचाऱ्याने, एखाद्या खाजगी आस्थापनेतल्या कर्मचाऱ्याने त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून अशी मोहिम राबवली तर त्यांबद्दल लोकांना आस्था वाटेल पण मराठी कलाकारांबद्दल लोकांना फार आकस आहे मनात. भूमिका करणारे आवडूनही जातात पण भूमिका घेणारे फारसे पटत नाहीत. एकतर मराठी कलाकारांना भरमसाठ पैसे मिळतात हा एक गैरसमज आहे.’ साधी रहाणी ‘ हे आजकाल सर्वमान्य मूल्य न राहिल्याने कलाकारही जरा छान छोकीत राहू लागले आहेत (त्यात गैर नाही काही.)
उपरस्ते अन् बरच काही… श्रुती वाकडकरांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन
कित्येक ज्येष्ठ कलाकार आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांच्या कहाण्या समोर आल्या तेव्हा आता ज्यांचे बरे दिवस आहेत त्याच कलाकारांना लोकांनी जाब विचारला की, तुमच्यातला कलाकार आज ह्या स्थितीत असतांना तुम्ही मदत का नाही करत? शासन मदत का नाही करत?
उपरस्ते अन् बरच काही… श्रुती वाकडकरांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन
सायली राजाध्यक्ष ह्या माझ्या मैत्रिणीचे वडिल माझ्यासाठी पितृतुल्य होते, ते काळजीने नेहमी, ‘ तुम्ही कलाकार आता नीट आर्थिक नियोजन करता ना? आम्ही फार कलाकारांना हलाखीचा सामना करतांना बघितलं आहे. ‘ असं विचारायचे.आम्हाला निवृत्तिवेतन नाही, कलाकार म्हणून EMI ला discount सोडा बँका कर्ज द्यायलाही काचकूच करतात. माझ्या सुदैवाने मी कॅम्स क्लब, विनय आपटे, पोतडी, दशमी अश्या निर्मिती संस्थांमध्ये काम केलं आणि माझा व्यवहार कधीच कुणी बुडवला नाही. टेलिव्हिजन बंद करून मला ५ वर्ष होतील. ह्यापुढे मी कधी करेन की नाही मला माहित नाही. पण जे काम करत आहेत त्यांच्या ह्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.
काउंटडाऊन सुरू! ‘वध 2’ चा दमदार नवा पोस्टर रिलीज, संजय मिश्रा–नीना गुप्ता मुख्य भूमिकेत
आता माझा विषय, माझ्या मुलांचं शालेय शिक्षण संपलं तरीही मी मराठी शाळांसाठी लढते आहे, लढत रहाणार आहे. तशीच मी मराठी कलाकारांकडून त्यांनी आमच्या लढ्याला साथ द्यावी अशी अपेक्षा करते. अवघं जगणं निकोप करायचं असेल, निरोगी समाज तयार करायचा असेल तर आपापल्या लढाईबरोबर इतरांचाही कानोसा घेऊन त्यांच्या लढ्यालाही आपण साथ द्यायला हवी. सर्वांचे सारे मंगल होवो. जय जगत. असं म्हणत शशांकच्या मोहीमेला चिन्मयी यांनी उघड पाठींबा दिला आहे.
