Video : ‘मातोश्री’त दोन किल्ले सरेंडर केल्याचे सांगणाऱ्या संतोष धुरींना राज ठाकरेंनी हाकललं…
2006 साली पक्ष स्थापन झाला तेव्हा मी शिवसेनेतून राज ठाकरे यांच्याबरोबर आलो होतो, म्हणजे आधी शिवसेनेत आणि त्यानंतर मनसेत आलो.
MNS Satosh Dhuri Join BJP : राज ठाकरेंनी मातोश्रीत दोन किल्ले सरेंडर केल्याचे जाहीरपणे सांगत हाती भाजपचं कामळ घेणाऱ्या संतोष धुरींची अखेर मनसेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष बाळकृष्ण धुरी यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतून हकालपट्टी करण्यात येत असून, यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कुठल्याही युनिट अथवा सभासद कामगारांशी व कंपनी व्यवस्थापनाशी यांचा काहीही संबंध नसेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मोठा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

तहात हारलेले दोन किल्ले कोणते? धुरींनी थेट सांगितलं
मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत धुरी यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धुरी यांनी मनसे आणि ठाकरे बंधुंवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मला निवडणुकीच्या चर्चेत घेतलं नाही, त्याचा राग नाही. मला सीट नाही दिली, त्याचाही राग नाही. साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. पण आमचे नेते संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत घेतलं नाही. त्यांना सहभागी करून घेतलं नाही. चौकशी केल्यावर दोन ठाकरे बंधूंमध्ये एक तह झाल्याचं कळलं. तो म्हणजे साहेबांनी दोन किल्ले ठाकरे गटाकडे सरेंडर केले. ते दोन किल्ले म्हणजे संतोष धुरी आणि संदीप देशपांडे, असा दावा संतोष धुरी यांनी केला.
BMC निवडणुकीत ट्विस्ट, अमराठी मतदार गेम फिरवणार; सर्व्हेतील आकड्यांनी खळबळ
2006 साली पक्ष स्थापन झाला तेव्हा मी शिवसेनेतून राज ठाकरे यांच्याबरोबर आलो होतो, म्हणजे आधी शिवसेनेत आणि त्यानंतर मनसेत आलो. मनसेचं कार्य सुरू ठेवलं, मनसेत शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो आणि आणखी काही महत्वाची पदे भूषवली. आमचं रक्त भगवं आहे. पण आता जी युती झाली आहे, म्हणजे हिरव्या लोकांशी ते जॉईन झाले आहेत. संदीप देशपांडे निवडणुकीला उभे राहणारच नव्हते. पण संतोष धुरीही दिसले नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. हे जेव्हा मला कळालं, तेव्हा मी संदीप देशपांडेंना सांगितलं. म्हटलं असं होत असेल तर यांच्यासोबत राहण्यात काय अर्थ आहे? ज्यांच्यामुळे राज ठाकरे यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, आता त्यांच लोकांना राज ठाकरे यांनी जवळ केलं आहे. आता त्या लोकांनी पूर्णपणे पक्षाचा (मनसे) ताबा घेतला आहे. मनसे आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पूर्ण सरेंडर केला आहे.
