भाजपचा मास्टरस्ट्रोक! सर्वसाधारण वॉर्डात ‘लाडकी बहीण’ शुभ्रा तांबोळींना उतरवले

BJP Shubhra Tamboli महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून भजपने धक्कादायक निर्णय घेत शुभ्रा पुष्कर तांबोळी यांना उमेदवारी जाहीर केली.

BJP Shubhra Tamboli

BJP’s masterstroke in Ahilyanagar Shubhra Tamboli Candidate in general ward : अहिल्यानगर शहराचे हृदय आणि सामाजिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला माळीवाडा परिसर सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 12 (वॉर्ड 12) मधून भारतीय जनता पक्षाने अत्यंत विचारपूर्वक आणि धक्कादायक निर्णय घेत शुभ्रा पुष्कर तांबोळी यांना उमेदवारी जाहीर केली. सर्वसाधारण प्रवर्गातील या प्रभागात सहसा पुरुष उमेदवारांना प्राधान्य दिले जात असताना, भाजपने एका नव्या आणि सुशिक्षित महिला चेहऱ्याला संधी देऊन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Video : पुणे महानगरपालिकेतील राज्यकर्त्यांनी प्र. क्र. 15 कडं दुर्लक्ष केलं, काय म्हणाले शिंदेंचे उमेदवार लोणकर

माळीवाडा हा अहिल्यानगरची ‘राजधानी’ मानला जातो. मात्र, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असूनही, आज उपनगरांच्या तुलनेत माळीवाडा विकासाच्या बाबतीत काहीसा मागे राहिल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने दिलेली ही उमेदवारी माळीवाड्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. सर्वसाधारण गटातून एका महिला उमेदवाराला संधी देऊन भाजपने केवळ महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला नाही, तर राजकारणातील पुरुषी वर्चस्वाला छेद देत एक नवा पायंडा रचला आहे.

नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच : आ. संग्राम जगताप

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शुभ्रा तांबोळी यांच्या रूपाने दिलेला हा धक्का विरोधकांसाठी अनपेक्षित मानला जात आहे. ज्याप्रमाणे संगमनेरमध्ये काही विशिष्ट राजकीय प्रयोग यशस्वी झाले, तसाच काहीसा प्रयोग भाजप माळीवाड्यात करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन चेहरा, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची तळमळ या जोरावर शुभ्रा तांबोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

उपरस्ते अन् बरच काही… श्रुती वाकडकरांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन

शुभ्रा तांबोळी यांनी आपल्या उमेदवारीनंतर प्रभागाच्या समस्यांवर बोट ठेवले आहे. देशाची ओळख जशी राजधानीवरून होते, तशीच शहराची ओळख माळीवाड्यावरून व्हायला हवी. परंतु, दुर्दैवाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत माळीवाडा आजही दुर्लक्षित आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर, आता माळीवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही ‘लाडकी बहीण’ खंबीरपणे पुढे येत असल्याची भावना प्रभागातील महिला वर्गामध्ये निर्माण झाली आहे.

काउंटडाऊन सुरू! ‘वध 2’ चा दमदार नवा पोस्टर रिलीज, संजय मिश्रा–नीना गुप्ता मुख्य भूमिकेत

भाजपच्या या निर्णयामुळे वॉर्ड क्रमांक 12 मध्ये नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. शुभ्रा तांबोळी यांच्या उमेदवारीमुळे केवळ भाजप कार्यकर्त्यांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. प्रस्थापित राजकारण्यांना बाजूला सारून एका सुशिक्षित महिला नेतृत्वाला संधी दिल्याने माळीवाड्याचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. आता माळीवाड्याची जनता या ‘लाडक्या बहिणी’ला आणि भाजपच्या या प्रयोगाला किती पाठबळ देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

follow us