नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच : आ. संग्राम जगताप

Sangram Jagtap: निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात युतीच्या दोन्ही पक्षांचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीने विजयी आघाडी घेतलीय.

  • Written By: Published:
Ahilyanagar MahanagarPalika Election Citizens' vote goes to the candidates of the NCP-BJP alliance: MLA Sangram Jagtap

Ahilyanagar MahanagarPalika Election: राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीच्या उमेवारांचा (Ahilyanagar MahanagarPalika Election) प्रचार सर्व प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात सुरु आहे. पूर्ण शहरात प्रत्येक प्रभागात युतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरातील नागरिकांचा कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर युतीचाच झेंडा फडकणार आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात युतीच्या दोन्ही पक्षांचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीने विजयी आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले.

विकासकामांमुळे नागरिकांच्या मनात युतीबद्दल शाश्वत वातावरण निर्माण झाले : आमदार संग्राम जगताप

महानगरपालिकेच्या प्रभाग पाचमधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचे उमेदवार काजल भोसले (अ), धनंजय जाधव (ब), हरप्रीतकौर गंभीर (क) व मोहित पंजाबी (ड) यांच्या प्रचाराचा शुभारंभ सिद्धार्थनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहूजी वस्ताद यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात लालटाकी परिसरातून प्रचारफेरी काढण्यात आली.

कलाटेंच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडच्या बहुचर्चित प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचा प्रचाराचा नारळ फुटणार…

यावेळी माजी नगरसेवक सुरेश तिवारी, भाजपचे दामोदर बठेजा, हरजीतसिंग वधवा, सुनील सहानी, राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राकेश गुप्ता, जनक अहुजा, राजूमामा जाधव, प्रदीप पंजाबी, जितू गंभीर, चेतन जग्गी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, जय भोसले, राजेद्र कांत्रोड, केवळ साब्लोक, अजय पंजाबी, अजय पठारे, साहेबराव काते, गुलाबराव गाडे, विशाल चांदणे,अंकुश मोहिते,पप्पू पाटील,आश्विन खुडे,पियुष जग्गी,राजू घोरपडे,सुनिल सकट,अशोक भोसले,आनंद राठोड,सिध्दार्थ मुथियान,रितेश पटवा,सुनिल राठोड आदींसह नागरिक उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले, मागच्या काही वर्षांपासून शहरात जो विकासाचा गाडा सुरु झाला आहे. त्याला आता वेग आल्याने शहराचा कायापालट होत आहे. आता या जनतेच्या प्रतिसादामुळे या विकासाच्या गाड्याला अधिक गती मिळणार आहे. या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचे चारही उमेदवार हे कार्यक्षम, विकासाची दृष्टी असणारे आहेत. त्यामुळे प्रभाग पाचमधील नागरिकांनी युतीच्या चारीही उमेदवारांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन केले.

follow us