शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे पाठबळ; आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap: महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचे उमेदवार हे सक्षम व कार्यक्षम आहेत. तसेच कोणत्याही प्रसंगी २४ तास उपलब्ध आहेत.

  • Written By: Published:
Sangram Jagtap Mahapalika election

Sangram Jagtap: महानगरपालिका निवडणुकीसाठी (Ahilyanagar MahanagarPalika election 2026) भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून व नारळ वाढवून झाला. यावेळी माळीवाडा ते दिल्लीगेट अशी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. (Chief Minister Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar for urban development; MLA Sangram Jagtap)

यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप (Sangram Jagtap), भाजपचे महामंत्री वीजय चौधरी व रवींद्र अनासपुरे, निवडणूक प्रभारी आ.विक्रमसिंह पाचपुते, भाजपा शहर अध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, विनायक देशमुख, सुनील रामदासी, माणिकराव विधाते यांच्यासह दोन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.


महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरमधील चित्र काय? वाचा, खास स्टोरी


सर्व महापालिकांमध्ये युतीची सत्ता येईल-रविंद्र चव्हाण

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यात महापालिकेच्या निवडणुकांसाठी निर्माण झालेले वातावरण पाहता सर्व महापालिकांमध्ये युतीची सत्ता येईल व जास्तीत जास्त महापौर युतीचेच होतील अशी शक्यता आहे. महापालिकेच्या विकासासाठी केंद्र व राज्य प्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिकेतही युतीच्या विचाराची सत्ता येणे आवश्यक आहे. अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप तसेच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे. शहर स्मार्ट व्हावे, शहरात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देत असल्याने जनतेने भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्याच मागे उभे राहावे. अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर बसवण्याची जबाबदारी मी सर्व जनतेवर देत आहे.


श्रुती राम वाकडकर यांचा सोसायटीधारकांशी झंझावाती गाठी-भेटींचा दौरा; नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडणारा संवाद


या निवडणुकीत न भूतो ना भविष्यातील असे यश युती मिळवणार : विखे

पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेली प्रचार रॅली ही ऐतिहासिक ठरली आहे. नागरिकांचा उस्पुर्त प्रतिसाद पाहता शहरात युतीसाठी फार सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत न भूतो ना भविष्यातील असे यश युती मिळवणार आहे. नगर शहराचा विस्तार होत असताना विकासही वेगाने होत आहे. उद्योग, व्यवसाय, रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नगर शहर हे सुंदर व सुरक्षित भयमुक्त व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप व मी प्रयत्नशील आहोत.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे पाठबळ मिळत आहेत. विकास निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे बहुमोल सहकार्य करत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचे उमेदवार हे सक्षम व कार्यक्षम आहेत. तसेच कोणत्याही प्रसंगी २४ तास उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी युतीच्या उमेदवारांचे चिन्ह कमळ व घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून युतीचे उमेदवारांना विजयी करावे, अशी विनंती केली.

बिनविरोध नगरसेवकांचा सत्कार

यावेळी युतीचे बिनविरोध निवडून आलेल्या पाचही नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा सत्कार माजी महापौर भगवान फुलसौंदर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला तर आ.संग्राम जगताप यांचा सत्कार सुनील रामदासी व सुवेंद्र गांधी यांनी केला.

follow us