ट्रम्प यांची मोठी घोषणा! 90 दिवसांसाठी सर्व देशांवरील टॅरिफमध्ये कपात, चीनवर मात्र 125 टक्के कर लादला

ट्रम्प यांची मोठी घोषणा! 90 दिवसांसाठी सर्व देशांवरील टॅरिफमध्ये कपात, चीनवर मात्र 125 टक्के कर लादला

Donald Trump back 10 percent tarrif from all contry for 90 Days China Tarrif increase for 125 percent : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 104 टक्के अतिरिक्त कर लावलाय. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चीनवर अतिरिक्त कर लादत 125 टक्के कर लादण्यात आला आहे.

26/11 च्या वेळचे सत्ताधारी राणाला भारतात आणू शकले नाही; तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर शाहंचा कॉंग्रेसला टोला

टॅरिफ धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही.

नगर शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तूर्तास स्थगित…’हे’ आहे कारण

तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. चीनने अमेरिकेला वाटाघाटीद्वारे त्यांचे एकतर्फी शुल्क उपाय ताबडतोब काढून टाकण्याची विनंती केले आहे.

आम्ही कधीच बदलत नाही; ‘बापाचं नाव बदलण्याची वेळ’ म्हणणाऱ्या जलील यांना फटकारलं

मात्र त्यानंतर आता पुन्हा अमेरिकेने जगातील सर्व देशांना 10 टक्के कर कपात करून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे चीनवर 125 टक्के कर लावण्यात आला आहे. अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे की ज्या देशावरील कर हा 90 दिवसांसाठी दहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्या देशांनी अमेरिकेच्या व्यापार विभाग ट्रेझरी आणि यूएसटीआर यांच्याशी व्यापार आणि चलनाची देवाण-घेवाण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तर चीनकडून जागतिक बाजाराचा जो अनादर केला जातो. त्यामुळे चीनवर हा अतिरिक्त कर लागण्यात आला आहे. जेणेकरून चीनला हे समजायला हवा की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचा काळ आता संपला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube