सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई; अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील सक्तीच्या रजेवर

सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई; अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील सक्तीच्या रजेवर

Ranya Rao Gold Smuggling Case : कर्नाटकातील हाय प्रोफाइल सोने तस्करीच्या प्रकरणात (Gold Smuggling Case) आज मोठी घडामोड घडली. या प्रकरणाची कर्नाटक सरकारने (Karnataka News) गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली. या प्रकरणात तुरुंगात असलेली अभिनेत्री रान्या राव हीचे (Ranya Rao) सावत्र वडील डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

रान्या राव हीला 3 मार्च रोजी दुबईवरून येताना बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्याकडे 12.56 कोटी रुपयांचे 14.2 किलो सोने आढळून आले होते. यानंतर रान्या रावने डीआरआयचे अतिरिक्त महानिदेशकांना एक पत्र लिहीले होते. माझ्यावर खोटा दावा थोपण्यात आल्याचा दावा तिने या पत्रात केला होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मला मारहाण केली तसेच कोऱ्या आणि काहीतरी लिहीलेल्या कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडण्यात आल्याचेही रान्या रावने या पत्रात म्हटले होते.

हायप्रोफाईल तस्करीचा पर्दाफाश! 14.8 किलो सोन्यासह अभिनेत्री गजाआड; कुठे घडली घटना?

विमानतळावरून अटक केल्यापासून न्यायालयात हजर करण्यापर्यंत दहा ते पंधरा वेळेस झापडी मारण्यात आल्या. सातत्याने मारहाण होत असतानाही त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला. जर सही केली नाही तर माझ्या वडिलांची ओळख सार्वजनिक करू अशी धमकी एका अधिकाऱ्याने दिल्याचा आरोप रान्या रावने केला.

रान्याचा मुक्काम तुरुंगातच

रान्या राव सध्या तुरुंगात आहे. तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे. कारण बंगळुरूतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी रान्या रावचा जामीन अर्ज फेटाळला. रान्या रावशी संबंधित सोने तस्करीचे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे. यामध्ये हवालाचे कनेक्शन आहे. यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित झाले आहे. त्यामुळे तस्करीच्या टोळीची भूमिका तपासणे गरजेचे आहे असा युक्तिवाद डीआरआयने आधीच केला होता.

रान्या रावचे सावत्र वडील रामचंद्र राव यांची या प्रकरणात काही भूमिका आहे का याचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने 10 मार्च 2025 रोजी अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांना नियुक्त केले होते. तसेच विमानतळावर पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा सीआयडी तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या तपासातून आणखी काय खुलासे होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

15 दिवसांत 4 दुबई ट्रिप, अधिकाऱ्यांना संशय; सोन्याची तस्करी करणाऱ्या अभिनेत्रीला अटक कशी झाली? A टू Z घटनाक्रम

follow us
  • fb
  • instagram
  • youtube