15 दिवसांत 4 दुबई ट्रिप, अधिकाऱ्यांना संशय; सोन्याची तस्करी करणाऱ्या अभिनेत्रीला अटक कशी झाली? A टू Z घटनाक्रम

15 दिवसांत 4 दुबई ट्रिप, अधिकाऱ्यांना संशय; सोन्याची तस्करी करणाऱ्या अभिनेत्रीला अटक कशी झाली? A टू Z घटनाक्रम

Ranya Rao Gold Smuggling From Dubai To Bangalore : कर्नाटकच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला (Ranya Rao Gold Smuggling) सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. नेमकं पोलिसांनी तिला कसं पकडलं. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. 3 मार्च रोजी रात्री उशिरा बेंगलोरच्या (Bangalore) केंपगौडा आंतरराष्ट्रिय विमानतळावर ही कारवाई करण्यात आलीय. लोकप्रिय कन्नड अभिनेत्री (Kannada Actress) रान्या राव हिला 12.56 कोटी रुपयांच्या सोन्यासह अधिकाऱ्यांनी पकडलं.

महसूल गुप्तचर संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची मुलगी रान्या राव गेल्या काही काळापासून त्यांच्या रडारवर (Bangalore Airport) होती. सोमवारी एमिरेट्सच्या विमानाने दुबईहून बेंगलोरमध्ये येताच एजन्सीने तिला अटक केलीय. अधिकाऱ्यांना सांगितलं की, तिने तिच्या कपड्यांमध्ये तस्करी केलेल्या सोन्याच्या सळ्या लपवल्या होत्या.

‘बायको माझं रक्त पिते, त्यामुळे झोपच…’ पोलीस कॉन्स्टेबलसोबत भयंकर घडतंय

रान्या राव पतिसोबत वारंवार आंतरराष्ट्रीय दौऱ्या करत होती. त्यामुळे तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी तिचं वास्तुविशारद जतीन हुक्केरीसोबत लग्न झालं होतं. डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्री 15 दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती. ज्यामुळे महसूल गुप्तचर यंत्रणेला तिच्यावर संशय निर्माण झाला. डीआरआयच्या नियमांनुसार, या प्रदेशात वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. रान्या जेव्हा जेव्हा बेंगळुरूला परतायची तेव्हा तेव्हा तिने भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसायचे.

रावने तिच्या मांड्या आणि कंबरेसह शरीरावर टेप लावून आणि कपड्यांमध्ये, जॅकेटमध्ये लपवून सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी तिने 30 वेळा दुबई प्रवास केल्याचे वृत्त आहे. ती कडक तपासणी टाळत असे आणि अनेकदा विमानतळ सुरक्षा तपासणीला बगल देण्यासाठी पोलिसांच्या एस्कॉर्ट्सचा सामना करत असे, असं सांगितलं जातंय. सोमवारीही रान्या तिच्यासोबत असलेल्या बसवराजू नावाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीने सुरक्षा तपासणीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, डीआरआयने तिला अडवले आणि सोन्यासोबत तिला रंगेहाथ पकडलं. अटकेनंतर, तिला अधिक चौकशीसाठी नागावरा येथील डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.

औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या आझमींच्या जीवाला धोका; म्हणाले …तर सरकार जबाबदार

अधिकाऱ्यांना संशय आहे की, तिने कस्टम तपासणी टाळण्यासाठी तिच्या पोलिस अधिकारी-वडिलांसोबतच्या नात्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. डीआरआयने जारी केलेल्या निवेदनात असंही म्हटलंय की, तिच्या अटकेनंतर त्यांनी बेंगळुरूच्या लव्हेल रोडवरील तिच्या घरावरही छापा टाकला. जिथे त्यांनी 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपये रोख जप्त केले. महिला प्रवाशाला 1962 च्या सीमाशुल्क कायदा अंतर्गत अटक करण्यात आली. तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय, असं निवेदनात म्हटलंय.

या प्रकरणात एकूण 17.29 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत, जे संघटित सोन्याच्या तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का आहे. 14.2 किलो सोन्याचा साठा हा अलिकडच्या काळात बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केलेल्या सर्वात मोठ्या सोन्यापैकी एक आहे, असं डीआरआयने निवेदनात म्हटलंय. रान्याला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

चौकशीदरम्यान, रान्याने दावा केला की, तिला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी कॉन्स्टेबल बसवराजूलाही ताब्यात घेतले. विमानतळावर रावला मदत करण्यात त्याच्या कथित भूमिकेबद्दल त्याचा जबाब नोंदवला. अधिकारी हे देखील तपासत होते की, ती सोने तस्कर म्हणून काम करणारी एकटी व्यक्ती होती की, दुबई आणि भारत दरम्यान कार्यरत असलेल्या तस्करी नेटवर्कचा भाग होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube