नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ 3 जुलै रोजी भारतातील 9 शहरांमध्ये भव्य लोकार्पण!

नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ 3 जुलै रोजी भारतातील 9 शहरांमध्ये भव्य लोकार्पण!

Ramayana: The Introduction : मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या 9 प्रमुख शहरांमध्ये एकाच दिवशी, 3 जुलै 2025 रोजी, नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या रामायण: द इंट्रोडक्शन या (Ramayana: The Introduction) भव्य सिनेमाचा पहिला अधिकृत युनिट प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.

हा चित्रपट रामायण या भारताच्या पौराणिक महाकाव्यावर आधारित असून, तो जगभरातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा आणि भव्य प्रकल्प ठरणार आहे. या ९ शहरांतील एकत्रित लोकार्पणाद्वारे, या चित्रपटाच्या भव्यतेची, दृष्टीची आणि महत्त्वाकांक्षेची प्रचीती देशभरातील प्रेक्षक आणि माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. ही केवळ एक लाँचिंग नाही, तर हा एक चळवळीचा आरंभ आहे.

जगातील सर्वात पुरातन आणि पवित्र महाकाव्यांपैकी एका कथेचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेले नव्याने कथन या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यातील दृष्टी, दर्जा आणि सर्जनशीलतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रामायण ही केवळ एक भारतीय कथा नाही, तर ही एक जागतिक पातळीवरील कलात्मक निर्मिती ठरणार आहे. जेथे पूर्व आणि पश्चिमेकडील सर्जनशील प्रतिभांचा संगम होणार आहे.

रामायणचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून, हा प्रकल्प प्राइम फोकस स्टुडिओज (Prime Focus Studios), 8 वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, आणि अभिनेता यश यांची Monster Mind Creations यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जात आहे.

वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा

हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग – दिवाळी 2026 दुसरा भाग दिवाळी 2027 जर एका युनिटच्या लाँचसाठी 9 शहरांमध्ये एकाचवेळी लोकार्पण होत असेल, तर या प्रकल्पाच्या संपूर्ण प्रदर्शनानंतर त्याचा जागतिक ठसा किती मोठा असणार आहे, याची कल्पनाच करणे थरारक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube