प्रसिद्ध अभिनेत्रीने केली 15 किलो सोन्याची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Actress Ranya Rao Gold Smuggling On Airport Gold : कन्नड चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती दुबईहून बंगळुरू विमानतळावर सोन्याचा मोठा साठा घेऊन आली होती. यादरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले (Bangalore) आणि झडतीदरम्यान तिच्याकडून 14.8 किलो सोने जप्त (Gold Smuggling) करण्यात आले. रान्या ही कर्नाटकचे डीजी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. ती तिच्या वडिलांच्या प्रभावाचा फायदा घेऊन तस्करी करत होती.
सध्या डीआरआय टीमने राण्याला ताब्यात घेतलंय. तिची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राण्या ही पोलिस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्यांच्या (Kannad Actress) आईने रामचंद्र राव यांच्याशी दुसरे लग्न केलंय. रामचंद्र राव यांनीही राण्यांच्या आईशी दुसरे लग्न केले. डीआरआयच्या सूत्रांनुसार, रान्याने यापूर्वी कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय. तिचा सर्वात चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘माणिक्य’. नंतर ती तस्करीच्या व्यवसायात सामील झाल्याचं समोर येतंय.
ठाकरे कुटुंबाकडे विरोधी पक्ष नेते पद नकोच, भास्कर जाधव यांना केले खुश!
अभिनेत्री रान्या राव बऱ्याच काळापासून दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करत असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांना राण्याबद्दल संबंधित माहिती मिळाली होती. यानंतर, डीआरआयचे अधिकारी विमान एअरपोर्टवर येण्याआधी दोन तास आधी विमानतळावर पोहोचले होते. दुबईहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली. या काळात, तपास पथक रान्याला शोधण्यासाठी येताच, तिने प्रथम तिच्या वडिलांचा प्रभाव वापरला.
12 कोटी रुपयांचे सोने जप्त
डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला तपास कक्षात नेले आणि तिचे कपडे तपासले. रान्याने तिच्या कपड्यांच्या आतील बाजूस 14.8 किलो सोन्याचा थर लावल्याचे उघड झाले. डीआरआय अधिकाऱ्यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्या रावकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत खुल्या बाजारात 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता डीआरआयने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध सुरू केला आहे.
भारतात सोन्याच्या मूळ मूल्याव्यतिरिक्त त्यावर कर देखील आकारला जातो. त्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढते. यामुळेच भारतातून दुबईला जाणारे पर्यटक अनेकदा तेथून सोने खरेदी करतात. कारण या देशात सोन्यावर कोणताही कर नाही.
नियमांनुसार एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशाला त्याच्या सामानात 40 ग्रॅमपर्यंतचे दागिने मोफत आणण्याची परवानगी आहे. त्याची किंमत 1 लाख रुपये आहे. हे फक्त महिला प्रवाशांच्या बाबतीत आहे. त्याच वेळी, जर भारतात येणारे प्रवासी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घेऊन जात असतील तर त्यांना सोन्यावर काही सीमा शुल्क भरावे लागेल. याशिवाय, एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहिलेली मुले दुबईतून करमुक्त सोन्याचे दागिने घेऊ शकतात. पण ते सोन्याचे नाणी, बार किंवा बिस्किटे घेऊन येवू शकत नाहीत.