Cash होईल कचरा! रॉबर्ट कियोसाकींचा इशारा; सोनं, चांदी, बिटकॉईनमध्ये पैसा गुंतवा

प्रसिद्ध वित्तीय लेखक आणि ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठा अलर्ट दिलाय.

Robert Kiyosaki Rich Dad Poor Dad

Robert Kiyosaki Alert Invest In Gold Silver : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत, तर शेअर बाजारातही उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, प्रसिद्ध वित्तीय लेखक आणि ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठा अलर्ट दिलाय.

कियोसाकी यांनी (Robert Kiyosaki) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक क्रॅश यंदा होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी लोकांना सुचवले की, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

कियोसाकी नक्की काय म्हणाले?

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत कियोसाकी यांनी म्हटलंय की, मी माझ्या ‘Rich Dad’s Prophecy’ या पुस्तकामध्ये इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक क्रॅश येईल, याची पूर्वकल्पना केली होती. आता त्याची वेळ आली आहे. बेबी बूमर पिढीचे रिटायरमेंट संपत आहे, अनेक लोक बेघर होतील. ही परिस्थिती अत्यंत दुखद आहे.

त्यांनी अचल संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सोने (Gold), चांदी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. कियोसाकी यांच्या मते, महागाईमुळे फक्त बचत करणाऱ्यांचे पैसे कमी होतात. परंतु सोनं, चांदी (Silver) आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. सोबतच त्यांनी एथेरियम (Ethereum) मध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला, कारण या दोन्ही मालमत्तांचा मूल्य भंडार आणि उद्योगात उपयोग आहे. कियोसाकी म्हणाले की, चांदी आणि एथेरियमच्या फायदे व तोटे समजून घेऊन, वित्तीय समझदारीने गुंतवणूक करावी.

चांदीच्या किमतीत वाढ

कियोसाकी यांनी चांदीच्या वाढत्या किमतीवरही भाष्य केलंय. सध्या चांदीची किंमत अंदाजे 50 डॉलर प्रति औंस आहे, आणि भविष्यात 75 डॉलर पर्यंत जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. त्यांचा दावा आहे की, आजकालची सर्वात हॉट मालमत्ता म्हणजे चांदी आणि एथेरियम आहे.

सोने आणि चांदीच्या बाजारातील स्थिती

2025 मध्ये कियोसाकीच्या पूर्वीच्या अंदाजानुसार सोने आणि चांदीच्या किमतींनी रेकॉर्ड मोडले आहेत. MCX (Multi Commodity Exchange) नुसार, फ्यूचर गोल्डची किंमत 1,23,677 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1,53,388 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे. चांदीने या वर्षी परताव्याच्या बाबतीत गोल्डला मागे टाकले आहे.

follow us