भाजपला माणसांची नाही पैशांची गरज; बंडखोर पुतण्याला पाठिंबा देत माजी खासदार कुकडेंचा घरचा आहेर
MP Madhukar Kukade यांच्या पुतण्याला उमेदवारी न दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
BJP needs money, not people; Former MP Madhukar Kukade Criticize BJP by supporting his rebel nephew : भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी भाजपमदील वाद चव्हाट्यावर आला आहे. कारण याठिकाणी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार मधुकर कुकडे यांचे पुतणे आशिष कुकडे यांनी बंडखोरी केली आहे. यावर आता कुकडे यांनी प्रतिक्रीया देताना नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
काय म्हणाले मधुकर कुकडे?
पुतण्याला उमेदवारी न दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना कुकडे म्हणाले की, आपण 15 वर्ष आमदार राहिलो मात्र कधीही पैसे पाहुन उमेदवारी दिलेली नाही. आता भाजपला मानसांपेक्षा पैशांची गरज आहे. पुतण्याला ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. तसेच बंडखोरी केलेल्या पुतण्या अशिष कुकडेंना त्यांनी पाठिंबा देखील जाहीर केला आहे. तसेच यावरून भाजपने आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली तरी आपण घाबरत नाही. असा इशारा देखील यावेळी कुकडे यांनी दिला आहे.
शेवगाव नगरपरिषदेमध्ये गणितं बदलली; एकनिष्ठांना डावलने राजळेंना भारी पडणार…
