सोन्याने रेकॉर्ड मोडलं! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.20 लाख रुपयांवर

10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1,20,000 रुपयांवर पोहोचली.

Gold Price Record High

Gold Price Record High : सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी मागील सर्व विक्रम मोडले आहेत. 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1,20,000 रुपयांवर पोहोचली आहे, म्हणजेच 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी या रकमेत पैसे द्यावे लागतील.

MCX वरील सोन्याचे दर

डिसेंबर 2025 डिलिव्हरी: 1,20,075 रुपये प्रति 10 ग्रॅम (1.66% वाढ)
फेब्रुवारी 2026 डिलिव्हरी: 1,21,350 रुपये प्रति 10 ग्रॅम (1.69% वाढ)
मागील आठवड्यातही सोन्याची किंमत 2.8 टक्क्यांनी वाढली होती.

विशेषत: सट्टेबाजांच्या नवीन व्यवहारांमुळे आणि मजबूत मागणीमुळे सोन्याचा भाव (Gold Price) वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील प्रशासनातील गतिरोध, फेडरल रिझर्व्हकडून अपेक्षित व्याजदर कपात आणि जागतिक व्यापारी तसेच भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित आश्रय म्हणून सोन्यात गुंतवणूक (Investment) करत आहेत.

चांदीची किमत

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

डिसेंबर 2025 डिलिव्हरी: 1,47,977 रुपये प्रति किलो (1.53% वाढ)
मार्च 2026 डिलिव्हरी: 1,49,605 रुपये प्रति किलो (१.59% वाढ)
मागील आठवड्यात चांदीच्या वायदा करारात 2.72% ने वाढ झाली होती.

जागतिक बाजारात देखील किंमती वाढल्या आहेत. सोन्याचा दर आता $3,973.60 प्रति औंस असून, चांदी $48.58 प्रति औंसवर पोहोचली आहे.

किंमत वाढण्याची कारणे

1. अमेरिकेतील सरकारी निधी बंदी आणि अनिश्चिततेचे वातावरण
2. जागतिक भू-राजकीय तणाव
3. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं व चांदीची वाढती मागणी

सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदार सोनं व चांदीला सुरक्षित आश्रय मानून खरेदी करत आहेत, ज्यामुळे किमती सतत वाढत आहेत.

follow us