पुरूषांनी सोनं घालणं म्हणजे बैलाला साखळी…; अजित पवारांच्या गोल्डन मॅन्सना कानपिचक्या

Ajit Pawar यांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी करत पुणे आणि जिल्ह्यामध्ये गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना फटकारलं आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar Criticize to Gold Man For men to wear gold is like chaining a bull : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक त्याचबरोबर मिश्किल टिपणी करून माध्यमांमध्ये देखील अशा पिकवतात यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे मिश्किल टिप्पणी करत पुणे आणि जिल्ह्यामध्ये गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना फटकारलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामधील चाकण येथे रांका ज्वेलर्स या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले सोनं हे पुरुषांना शोभून दिसत नाही. तर ते स्त्रियांनाच शोभून दिसतं. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नये. नाहीतर जे पुरुष सोनं घालतात. ते बैलाला साखळी घातल्यासारखं दिसतं. हा प्रश्न ज्याच्या-त्याच्या पैशांचा आहे. पण सोनं हा स्त्रिचा दागिना म्हणून शोभून दिसतो. याची आठवण यावेळी अजित पवार यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्यांना करून दिली आहे.

उद्योजक राणा सूर्यवंशींवर प्राणघातक हल्ला; एका आरोपीला अटक, नक्षली कनेक्शनची शक्यता

दरम्यान त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत देखील सापडतात. नुकतच त्यांनी राज्यातील पावसानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी धाराशिव, बीड जिल्ह्यांत दौरा केला. यावेळी त्यांनी पैशांचं सोंग करता येत नाही. असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी आता माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

प्रभासच्या ‘द राजा साब’ ट्रेलर लॉन्चचा महाउत्सव! आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील 105 थिएटर्समध्ये भव्य स्क्रीनिंग

अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमध्ये त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये किंवा घरामध्ये देखील आपण सर्रास ही म्हण वापरतो की, सगळी सोंग करता येतात. पण पैशांचं सोंग आणती येत नाही.

पुन्हा निर्णय बदलला! सरन्यायाधीशांच्या आई कमलताई गवई अमरावतीमध्ये ‘संघ’ कार्यक्रमाला जाणार

ग्रामीण भागामध्ये अशी भाषा वापरली जाते. म्हणून त्यांना समजण्यासाठी मी हे विधान केलं. पण मी हे विधान वेगळ्या उद्देश्याने केलं. मात्र माझ्या या विधानाचा गैरवापर केला गेला. माध्यमांमध्ये मी त्या विधानाच्या अगोदर काय बोललो. नंतर काय बोललो ते दाखवलं जात नाही. त्यातून गैरसमज पसरवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

follow us