अभिनेत्री हेमामालिनी यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराच्या भेटीवरून वाद! पण नेमकं कारण काय?

अभिनेत्री हेमामालिनी यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराच्या भेटीवरून वाद! पण नेमकं कारण काय?

Controversy over actress Hema Malini’s visit to Jagannath Puri temple: ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुरा लोकसभा मतदार संघाच्या खासदार हेमामालिनी यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराला दिलेल्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. नुकतीच हेमामालिनी यांनी जगन्नाथ पुरी मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेतलं होतं. मात्र यावेळी एक व्हिडिओ समोर आला ज्यावरून हा वाद सुरू झालाय.

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळावर आकारणार युजर डेव्हलपमेंट फी…

हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की हेमामालिनी यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतलं यावरून त्यांचा हा मंदिरातील प्रवेश अवैध आहे असा आरोप करत स्थानिक संघटना असलेल्या श्री जगन्नाथ सेना यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे यामध्ये म्हटलं गेलं आहे की हेमामालिनी यांच्याशी विवाह करण्यासाठी त्यांचे पती धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता त्याचबरोबर त्यांच्या विवाह देखील मुस्लिम परंपरेनुसार झाला होता त्यामुळे त्यांनी मंदिरात प्रवेश करणं हे धार्मिक नियमांचे उल्लंघन असून त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

…मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा? जयंत पाटलांनी टेंडरवरून सरकारला घेरले

त्याचबरोबर यावरून पुरी लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार संबित पात्रा देखील अडचणीत आले आहेत या संघटनेने त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे कारण त्यांना देखील माहिती होतं की हेमामालिनी या मंदिरात जाणार आहेत. दरम्यान या संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं की सर्वांना नियम सारखाच हवा या मंदिरामध्ये पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांना देखील जाण्यास मनाई करण्यात आली होती त्यामुळे हेमामालिनी ने केलेला मंदिर प्रवेश देखील धार्मिक नियमांच्या विरुद्ध आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube