केजरीवाल आणि सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला; पवारांनी डागली मोदी सरकारवर तोफ
Sharad Pawar on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) धामधुमीत विरोधकांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा’ रॅली काढली. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली आयोजित केली होती. या रॅलीत इंडिया आघाडीचे (India Aghadi) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान, या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान सत्ताधारी भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांनी केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यावरील अटकेची कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला असल्याचं म्हटलं.
Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय
शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर आणि लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. संविधान आणि लोकशाहीला वाचवायचं असेल तर भाजपला रोखणं गरजेचं आहे. कारण, राजकीय विरोधकांवर हे सरकार सुडबुद्धीने कारवाया करत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमकावण्यात आलं. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असोत वा अन्य कोणतेही मुख्यमंत्री असोत, त्यांनी तुरुंगात टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. केजरीवाल आणि सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका पवारांनी केली.
‘निवडणुकीत PM मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न’; राहुल गांधींचा गंभीर आरोप
पुढं बोलताांना पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी राज्यघटना दिली आहे, ती राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधानविरोधी शक्तींना रोखले पाहिजे. आता देशात निवडणुका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रावर तुम्ही जाला तेव्हा लक्षात ठेवा की, भाजपच्या विरोधात मतदान करायचे आहे. भाजपच्या साथीदारांच्या विरोधात मतदान करायचं आहे, असं आवाहनही पवारांनी केल.
मोदी मॅच फिक्सिंग करताहेत
सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. अप्रामाणिकपणे अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन किंवा कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अपायर कोणी निवडले. नरेंद्र मोदी यांनी.. मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आली… त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी घोषणा केली की मी 400 जागा जिंकणार आहे… पण ईव्हीएम, मॅच फिक्सिंग आणि प्रेसचा दबाव असूनही त्यांची संख्या 180 च्या पुढे जाणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.