बिहार निवडणुकीतील पराभवाचं चिंतन, प्रशांत किशोर यांचा 24 तासाचं मौन संपलं, केली मोठी घोषणा
लोकांशी संवाद साधतील आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आणि ते करण्यासाठी सरकार काय करत आहे असा आढावा ते घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत जनसूरज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. (Bihar) त्याचबरोबर त्यांना चांगली मतंही मिळालेली नाहीत. प्रशांत किशोर यांनी याची जबाबदारी घेतली. त्यानंतर, २० नोव्हेंबर रोजी प्रशांत किशोर यांनी भितिहरवा आश्रमाला भेट दिली, जिथे त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.त्यानी तेथे 24 तासांचा उपवास आणि मौन ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी मोठे निर्णय घोषीत केले.
प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ते गांधीजींच्या प्रेरणेने पुन्हा आंदोलन सुरू करणार आहेत. १५ जानेवारीपासून ते बिहार नवनिर्माण संकल्प अभियान सुरू करण्यासाठी बिहारमधील सर्व १,१८,००० वॉर्डांना भेट देतील. याचाच एक भाग म्हणून ते लोकांशी संवाद साधतील आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आणि ते करण्यासाठी सरकार काय करत आहे असा आढावा ते घेणार आहेत.
राजपूत, भूमिहार, दलित नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये कोणत्या जातीचे वर्चस्व?
निवडणुकीच्या अगदी तोंडावर १०,००० रुपये देऊन सरकारने गरीब मतदारांना गप्प केलं आहे. शिवाय, २ लाख रुपयांच्या लोकप्रिय आश्वासनामुळेही जनतेची दिशाभूल झाली आहे. त्यांनी नितीश कुमार यांनाही निशाणा साधला की, त्यांना प्रामाणिक मुख्यमंत्री मानणे आता खूप कठीण झाले आहे. त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांनाही सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पक्षासाठी मोठी घोषणा
प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षासाठीही मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ९० टक्के उत्पन्न जन सुराज पक्षाला समर्पित केले जाईल. गेल्या २० वर्षात मी जी काही मालमत्ता मिळवली आहे, ती मी माझे कुटुंबीय घर वगळता, जन सूरजला दान करणार आहे असंही ते यावेळ म्हणाले आहेत.
