मोठी बातमी! प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?, प्रियंका गांधींची घेतली भेट

बिहारच्या निकालानंतर जवळपास एका महिन्यानंतर प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतल्याने वेगळवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 15T184240.867

जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय महासचिवर आणि खासदार प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. अलीकडेच प्रशांत किशोर यांच्या पक्षाने बिहारची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडं काँग्रेसलाही विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आलं होतं. बिहारच्या निकालानंतर जवळपास एका महिन्यानंतर ते काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट घेत असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

प्रशांत किशोर आणि प्रियांका गांधी यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची असल्याचं दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितलं आहे. मागील काही वर्षांपासून प्रशांत किशोर आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कटूता निर्माण झालेली आहे. जन सुराज पक्षाचे प्रमुख काँग्रेसला सातत्याने लक्ष्य करताना दिसून येत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी काँग्रेसच्या मोहिमेवर टीकेची झोड उठवली होती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यात काढलेली ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही निवडणुकीचा मुद्दा असूच शकत नाही, असं विधान किशोर यांनी केलं होतं.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने २३८ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी जवळपास २३६ उमेदवारांची (९९.१६ टक्के) अनामत रक्कम जप्त झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली. महाआघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेसने ६१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ सहाच जागांवर पक्षाला यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे- २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार निवडून आले होते. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर बिहार निवडणुकीत फेल; अनेक उमेदवार डिपॉझिट जप्तच्या वाटेवर

प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांत जुने संबंध आहेत. राजकारणात येण्यापूर्वी किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून काम करीत होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. २०२१ मध्ये जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर किशोर यांनी काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावासह प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत किशोर यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर एक सविस्तर सादरीकरण केलं होतं. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर त्यांच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी ‘सशक्त कृती समिती’स्थापन केली. त्याचवेळी खुद्द प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये सामील होण्यास तयार असल्याचं सांगितलं जात होतं. काही दिवसानंतर काँग्रेसच्या समितीचा भाग होण्याचा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी नाकारल्यामुळे या विषयावरील चर्चा अशस्वी ठरली. त्यावेळी किशोर यांना अधिक अधिकार आणि स्वतंत्र निर्णय स्वातंत्र्य हवं होतं, असं सूत्रांनी सांगितलं होते. त्यानंतर काँग्रेसने एक अधिकृत निवेदनाद्वारे वाटाघाटी अयशस्वी ठरल्याची माहिती दिली होती.

प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सामील होण्यासाठी पक्षाने त्यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु, त्यांनी नकार दिल्यानंतर या विषयावरील चर्चा अयशस्वी ठरली. काँग्रेसला बळकटी मिळण्यासाठी किशोर यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि सूचनांचे आम्ही कौतुक करतो, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं होते. त्यानंतर काही मिनिटांतच प्रशांत किशोर यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती.

follow us