Congress : महायुतीचे नेते सत्तेसाठी हापापलेले, हर्षवर्धन सपकाळ टीकेची झोड…

Congress : महायुतीचे नेते सत्तेसाठी हापापलेले, हर्षवर्धन सपकाळ टीकेची झोड…

Harshvardhan Patil On BJP : महायुतीतील नेते सत्तेसाठी हापापलेले असून महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Patil) टीकेची झोड उठवलीयं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरात आले होते. यावेळी अहिल्यानगर काँग्रेसच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कैलास बोराडे सळई चटके प्रकरण : जरांगेंनी अर्धनग्न व्हिडिओ दाखवताच बोराडे म्हणाले, मी प्रसाद म्हणून दारू…

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सरकारला समाजवादी विचार मान्य नाही हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे. राज्यातील जनता फोडा आणि राज्य करा असं ब्रिटीशांचं धोरण राज्य सरकारने राबवलंय. हे सरकार जातिवादी समाजव्यवस्था सरकार आणू पाहतंय. राज्यात कोयता गॅंग, आका अशा अनेक गॅंग म्हणजे सरकारने स्विकारल्याच्या धोरणाचा परिणाम आहे. आज आम्ही मस्साजोग ते बीड जाणार असून समाजात पेरलेली विषमता नाहीशी करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ स्पष्ट केलंय.

बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा नाद, विरोध करणाऱ्याला बेदम मारलं, जबडा मोडला

तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवरुन राज्य सरकारने चुप्पी साधलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने राज्यभर सद्भभावना जागर करण्यासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढणार असून जनतेचे प्रश्न समजून घेणार आहोत. निवडणुकीमध्ये जय पराजय चालतच राहील पण सरकारने ज्वलंत मुद्द्यांवर काम केलं पाहिजे. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, महायुतीचं सरकारला विचाराशी काही देण घेण नाही,. महायुती केवळ सत्ता, सत्ता सत्तेसाठी एकत्रित आलेलं हे ट्रिपल इंजिन आहे, सत्ता ही काँग्रेसला हवी पण ती विचारांसाठी असल्याचंही सपकाळ यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube