बिहार विधानसभा निवडणुकांचा ‘शंखनाद’; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल

2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

  • Written By: Published:
बिहार विधानसभा निवडणुकांचा 'शंखनाद'; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल

Bihar polls to be held in 2 phases, results on November 14 : बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं असून, आज (दि.६) निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार असून, मतमोजणी १४ नोव्हेंबर  रोजी होणार आहे. पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी मतदार होणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे.

मोठी बातमी : ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा

मतदानाच्या १० दिवसआधीपर्यंत जोडता येणार नाव

बिहार एसआयआरबाबत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे. अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. तरीही काही समस्या असल्यास, तुम्ही अर्ज करू शकता. मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना यादीत नावं जोडता येतील. अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

बिहारमध्ये किती मतदार?

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, यावेळी बिहारच्या निवडणुका (Bihar Assembly Election) सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. यासाठी आम्हाला निवडणुकीसाठी बिहारच्या जनतेचे सहकार्य हवे आहे. बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार असून, त्यापैकी ३.९२ कोटी महिला मतदार आणि ३.५ कोटी पुरुष मतदार आहेत. १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १२०० मतदार असतील असेही ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले. वृद्ध मतदारांची संख्या ४ लाख असून, १०० वर्षे पूर्ण केलेले मतदारांची संख्या १४ हजार इतकी आहे. वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील. सर्व बूथवर निवडणूक प्रक्रिया थेट दाखवले जाईल. खोट्या बातम्यांविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल. सर्व बूथवर हिंसाचाराला शून्य सहनशीलतेचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील.

नेट वन अॅप रिलीज होणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घोषणा केली की निवडणूक आयोगाचे नवीन “नेट-वन” सिंगल-विंडो अॅप बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लाँच केले जाईल. हे अॅप सर्व निवडणूक अॅप्सची जननी म्हणून वर्णन केले जात आहे. हे अॅप बिहार निवडणुकीदरम्यान पूर्णपणे कार्यरत आणि सक्रिय असेल, ज्यामुळे सर्व प्रमुख निवडणूक-संबंधित प्रक्रियांचे रिअल-टाइम निरीक्षण करता येईल.

बिहार निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला; 50 टक्के आरक्षणावर मोठं भाकीत

बिहार निवडणुकांचा इतिहास नेमका कसा?

जर आपण बिहारबद्दल बोललो तर तेथे सहा टप्प्यात मतदान झाले आहे. १९५२ पासून आतापर्यंतच्या बिहार विधानसभेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात एक ते सहा टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. १९६९ मध्ये बिहारमध्ये पहिल्यांदाच मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यानंतर एकाच दिवशी एकाच टप्प्यात मतदान झाले. १९८० आणि १९९० च्या वर्षांबद्दल बोलायचे झाले तर, एकाच टप्प्यात मतदान झाले. राष्ट्रपती राजवटीत बिहारमध्ये पाच वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

बिहारची पहिली विधानसभा निवडणूक

१९५२ मध्ये बिहारमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक २१ दिवस चालली, ४ ते २४ जानेवारी दरम्यान मतदान झाले. १९५७ मध्ये २५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत १६ दिवसांत मतदान झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती राजवटीत ९ फेब्रुवारी १९६९ रोजी संपूर्ण बिहार निवडणुका घेतल्या. १९८० मध्ये ३१ मे आणि २७ फेब्रुवारी १९९० रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. १९६२ मध्ये १८, २१, २३ आणि २५ फेब्रुवारी रोजी चार टप्प्यात मतदान झाले. १९६७ मध्ये १५, १७, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी चार दिवसांत मतदान झाले. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या.

‘बिहार विधानसभेत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार; मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आकडाही सांगितला

मतदार मतदान केंद्रांवर मतदारांना जमा करता येणार मोबाईल

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, पूर्वी मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी नव्हती, परंतु आता मतदान केंद्राशेजारी मोबाईल फोन ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाच वेळा राष्ट्रपती राजवट 

१९६९, १९७२, १९७७, १९८० आणि ऑक्टोबर २००५ मध्ये राष्ट्रपती राजवटीच्या काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. १९६८ ते १९८० पर्यंत जवळजवळ दोन वर्षे बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट होती.

२००५ मध्ये त्रिशुंक विधानसभा

२००५ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवटीत ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका झाल्या.

 

follow us