मोठी बातमी : ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. समान नाव असणाऱ्या उमेदवारांमुळे अनेकदा मतदारांमध्ये गोंधळ होतो यावर उपाय म्हणून आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा रंगीत फोटो ईव्हीएमवर लावला जाईल, ज्यामुळे मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराची योग्य ओळख पटवून मतदान करता येईल असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
ECI revises guidelines to make EVM Ballot Papers more readable. Starting from Bihar, EVMs to have colour photographs of candidates for the first time. Serial number to also be displayed more prominently pic.twitter.com/hcf3EACeoO
— ANI (@ANI) September 17, 2025
निवडणूक आयोगाने (Election Commission) बुधवारी प्रेस रिलीज जारी करत म्हटले आहे की, ईव्हीएम मतपत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत फोटो (Color Photos) छापली जाणार आहे. यामुळे उमेदवारांची ओळख अधिक स्पष्ट होईल. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे चेहरे फोटोच्या जागेच्या तीन चतुर्थांश भाग व्यापतील, ज्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसतील. तसेच सर्व उमेदवार आणि नोटा (NOTA) क्रमांक देखील ईव्हीएमवर ठळक अक्षरात छापले जातील. फॉन्ट आकार 30 असेल.
याचबरोबर सर्व उमेदवारांची नावे आणि नोटा एकाच फॉन्टमध्ये आणि फॉन्ट आकारात छापले जातील जेणेकरून मतदारांना ते वाचणे सोपे होईल. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकांसाठी एक मानक वजन देखील निश्चित केले आहे. हे मतपत्रके 70 जीएसएम असतील.
आरक्षणासाठी दोन समित्या करायची आवश्यकता होती का? शरद पवार स्पष्टच म्हणाले
विधानसभा निवडणुकांसाठी विशेष गुलाबी कागद वापरला जाईल. निवडणूक आयोग आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसह हे बदल अंमलात आणत आहे. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ही प्रक्रिया पाळली जाईल.