Bihar Assembly Election: पाच आयपीएस अधिकारी रिंगणात उतरले ! पण जिंकला एकच ‘सिंघम’
Bihar Assembly Election- शिवदीप लांडेला फार काही करिश्मा दाखविता आला नाही. आणखी चार निवृत्त आयपीएस अधिकारी हे आमदारकीसाठी नशीब अजमावत होते.
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) रिंगणात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक उतरले होते. गायक, भोजपुरी चित्रपटातील अभिनेतेही रिंगणात होते. परंतु चर्चा झाली ती आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजकारणातील यश अपयशाची. एकेकाळी बिहारमध्ये सिंघम म्हणून ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात उतरले. जेथे सेवा बजाविली त्याच बिहारमधील दोन मतदारसंघातून त्यांनी नशिब अजमावले. परंतु शिवदीप लांडेला फार काही करिश्मा दाखविता आला नाही. शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांच्याबरोबर आणखी चार निवृत्त आयपीएस (IPS)अधिकारी हे आमदारकीसाठी नशीब अजमावत होते. परंतु त्यातील एकच जण यशस्वी झालाय. (Bihar Assembly Election Out of five IPS officers who contested this year’s assembly election, only one won)
तब्बल 99 वर्षांचं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपवण्यासाठी भाजप मैदानात, काय आहे राजकीय गणित?
माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रांनी मारली बाजी
माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे विजयी झाले आहेत. ते बक्सर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय कुमार तिवारी उर्फ मुन्ना तिवारी यांचा तब्बल 28 हजार 533 मतांनी पराभव केलाय. मिश्रांना 84 हजार 901 मते मिळाली. आनंद मिश्रा हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना आसाम केडर मिलाले होते. आसाम आणि मेघालयामध्ये त्यांनी जबदरस्त कामगिरी केली होती. आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. हा अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणला गेला. त्याच्या काळात आसाममध्ये 150 जणांचे एन्काउंटर झाले होते. पण 2024 मध्ये त्यांनी आयपीएस सेवा सोडली. बिहारमध्ये परतले होते. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडून ते निवडणूक लढणार होते. पण भाजपने त्यांना आपल्याकडे घेतले आणि विधानसभेत पाठविले.
तब्बल 99 वर्षांचं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपवण्यासाठी भाजप मैदानात, काय आहे राजकीय गणित?
शिवदीप लांडे दोन्ही ठिकाणी अपयशी
2006 बॅचचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी थेट नोकरीचा राजीनामा दिला आणि ते राजकारणात आले. जबरदस्त कामगिरीमुळे त्यांना बिहारचे लोक सिंघम म्हणत. लांडे हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहेत. तर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. हेच सिंघम शिवदीप लांडे हे दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु त्यांना दोन्ही मतदारसंघातील जनतेने स्वीकारले नाही. जमालपूर मतदारसंघात लांडे यांना 15 हजार 655 एवढी मते मिळाली. ते थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर जनता दल युनायटेडचे नचिकेत यांनी लांडे यांचा पराभव केला. तर अररिया मतदारसंघात शिवदीप लांडेंना केवळ 4085 मते मिळाली, म्हणजेच त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
जनसूरज पानिपत, आयपीएस अधिकाऱ्याचा पराभव
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षाकडून निवृत्त आयपीएस राकेशकुमार मिश्रा हे मैदानात उतरले होते. पण दरभंगा मतदारसंघात ते थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले. येथून भाजपचे संजय सरावगी हे निवडून आले. तर 1989 च्या बॅचचे माजी आयपीएस अधिकारी ब्रज किशोर रवी हेही मोठ्या फरकाने पराभूत झाले. ते रोसेरा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना भाजपचे उमेदवार बिरेंद्रह कुमार यांनी 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. ब्रज किशोर हे तामिळनाडूचे डीजीपी राहिलेले आहेत. पराभवाच्या यादीत आणखी एका अधिकाऱ्याचे नाव येते. माजी आयपीएस अधिकारी जयप्रकाश सिंह हे जनसूराज पक्षाकडून छपरा मतदारसंघातून नशिब अजमावत होते. परंतु त्यांनाही मतदारांनी नाकारले आहे. आयपीएस असताना या अधिकाऱ्यांनी जबरदस्त कामगिरी करून नाव कमावले. परंतु पॉलिटिकल करिअरमध्ये ते सक्सेस होऊ शकले नाहीत, हेच यातून दिसून येत आहे.
