अमेरिकेत पाकिस्तानींना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टीमेटम; काय घडलं?

अमेरिकेत पाकिस्तानींना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टीमेटम; काय घडलं?

Donald Trump News : अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरात खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने घुसखोरी करणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशांत पाठवण्याच्या कामाला अमेरिका सरकारने सुरुवात केली आहे. या दरम्यान ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या नव्या यात्रा प्रतिबंधानुसार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील (Pakistan) नागरिकांना पुढील आठवड्यापासूनच अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते.

दरम्यान, अमेरिकेप्रमाणेच पाकिस्ताननेही कठोर भूमिका घेतली आहे. अवैध पद्धतीने पाकिस्तानात राहत असलेले अफगाणी तसेच अफगाण नागरिक कार्डधारकांनी येत्या 31 मार्चपर्यंत पाकिस्तान सोडावा अशा सूचना पाकिस्तान सरकारने दिल्या आहेत. या मुदतीत जे लोक देश सोडणार नाहीत त्यांना निर्वासित केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

रायटर्समधील रिपोर्टनुसार या यादीत अन्य देशांचाही समावेश असू शकतो. पण हे देश कोणते आहेत याची माहिती अजून सार्वजनिक झालेली नाही. या निर्णयाचा सर्वाधिक फटका अफगाणी नागरिकांना बसू शकतो. कारण या लोकांना शरणार्थी तसेच विशेष अप्रवासी व्हिसावर अमेरिकेत पुनर्वसनाची मंजुरी देण्यात आली आहे. या लोकांनी अफगाणिस्तानात अमेरिकेसाठी काम केले होते. त्यामुळे या लोकांना तालिबानपासून धोका आहे.

रशिया-युक्रेनने चर्चा करावी, अन्यथा खूप उशीर होईल..झेलेन्स्कीसोबतच्या वादानंतर ट्रम्प यांची पुतिनला धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी 20 जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता. यामध्ये अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विदेशी नागरिकांची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. ज्या देशांतील नागरिकांची अमेरिकेतील एन्ट्री पूर्णपणे किंवा काही प्रमाणात बंद करण्याची गरज आहे अशा देशांची यादी 12 मार्च पर्यंत सादर करण्याच्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

अफगाणी लोकांची कसून चौकशी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरणार्थी म्हणून किंवा विशेष व्हिसा घेऊन अमेरिकेत पुनर्वसनाची मंजुरी मिळवणाऱ्या अफगाण नागरिकांची कसून चौकशी केली जाते. जगातील अन्य देशांतील नागरिकांच्या तुलनेत अफगाण नागरिकांची अधिक बारकाईने चौकशी केली जाते. रायटर्सने आधीच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की अफगाण पुनर्वास प्रक्रियेच्या समन्वयकांना एप्रिलपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ऑक्टोबर 2023 मधील एका भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या योजनेबाबत माहिती दिली होती. यामध्ये गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, यमन आणि सुरक्षेला धोका उत्पन्न होईल अशा कोणत्याही ठिकाणच्या लोकांना अमेरिकेत येऊ दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

रशिया युद्ध थांबवणार! अमेरिका अन् रशियाचा पुढाकार; रियादमध्ये नेमकं काय घडलं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube