चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, ११ जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

Pakistan Blast: आज (दि. १४ फ्रेब्रुवारी) पाकिस्तानमध्ये (Pakistan मोठा बॉम्बस्फोट (Bonb Blast) झाला. यामध्ये स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हा स्फोट नैऋत्य पाकिस्तानमध्ये झाला. मृत झालेले सर्व जण सकाळी कामावर जाणारे कामगार होते. दरम्यान, हा स्फोट कोणी आणि का केला ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पाकिस्तानमध्ये १०० दिवसांत झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.
चहूबाजूंनी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांकडून राष्ट्रवादीत ‘मानाचं पान’
पाकिस्तानामध्ये झालेल्या या भीषण स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. उपायुक्त वली काकर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, कोळसा खाण कामगारांना बलुचिस्तान प्रांतातील हरनाई भागात घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ हा स्फोट झाला. यात जखमी झालेले ११ लोक हे याच वाहनातील कामगार आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा ट्रकमध्ये १७ खाण कामगार होते. स्फोटात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले कामगार शांगला येथील पुराण गावातील रहिवासी आहेत.
रिमोटद्वारे घडवून आणला स्फोट…
एका निमलष्करी अधिकाऱ्याने माहिती दिली की, कोळसा खाण कामगारांच्या ट्रकला रिमोट कंट्रोल डिव्हाइसद्वारे लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, अद्याप कोणत्याही आंतकवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
सध्या अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह आणि जखमींना वैद्यकीय सुविधेत हलवल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तर पोलिसांकडूनही स्फोटाचा तपास सुरू झाला.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले की, या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार, स्फोटके रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली होती. रिंद यांनी कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेचा निषेध केला. त्यांनी कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. जखमी कामगारांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बुगती म्हणाले की, निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणारे दहशतवादी कोणत्याही प्रकारच्या माफीस पात्र नाहीत. बलुचिस्तानच्या शांततेला हानी पोहोचवणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करू, असं ते म्हणाले.
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शाहरागमधील स्फोटाचा तीव्र निषेध केला आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला.