जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी इतिहास संशोधक आहेत का? चुकीचा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल, मनसेचा संताप

जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी इतिहास संशोधक आहेत का? चुकीचा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल, मनसेचा संताप

MNS Yogesh Khaire Criticized Jitendra Awhad and Amol Mitkari : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावरून एक नवं युद्ध पेटलंय. दरम्यान आता यामध्ये मनसेने (MNS) देखील उडी मारल्याचं दिसतय. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) इतिहास संशोधक आहेत का ? चुकीचा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल करायची, असा मनसेने सवाल केलाय.

एखाद्या कृष्णाजी भास्करचं उदाहरण द्यायचं आणि त्याचा आधार घेत आत्ताच्या संपूर्ण ब्राम्हण समाजाला पिंजऱ्यात उभं करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील काही किरकोळ मुस्लिम उदाहरणं द्यायची (त्यातील अनेकांचा उल्लेख इतिहासात आढळत सुद्धा नाही) आणि ते हिंदूंचं राज्य होतं, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, असा प्रकार सध्या सुरु असल्याचं मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी (Yogesh Khaire) म्हटलंय.

तुमचा कार्यकाळ औरंगजेबापेक्षा खूप खराब, शेतकऱ्यांची आत्महत्या… संजय राऊतांनी टोचले सरकारचे कान

कोण काय करत होतं… कोण कुठं होतं… यापेक्षा ज्या औरंगजेब की जो धर्मांद पद्धतीने राज्यकारभार करत होता, त्याच्या विरोधात सर्व जातीमधील लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ उभं केलं हेच महत्वाचं आहे. हिंदूंची मंदिरे उध्वस्त करणारा, हिंदूंवर अन्यायी जिझीया कर लादणारा, हिंदूंच्या कत्तली करणारा, हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरे करणारा औरंगजेब….. आणि या सगळ्या विरोधात उभं राहिलेलं “हिंदवी स्वराज्य, असं देखील योगेश खैरे यांनी म्हटलंय.

छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंगला लिहिलेल्या पत्रात, आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत का ? आपल्या देवालायांची मोडतोड झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत, धर्माचरण शुन्य आहोत, अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अशावेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे, असं लिहिलेला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कुठलं होतं? हे स्पष्ट करतं !

…अखेर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ठरला! भारताच्या ऑलराऊंडरला मिळाली मोठी जबाबदारी

गोव्यात आजही उपलब्ध असलेल्या शिलालेखात असलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं पत्र यातील एक वाक्य आहे, हे हिंदूंचे राज्य झाले आहे. यापेक्षा आणखी कसलं स्पष्टीकरण पाहिजे, असं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उपस्थित केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube