पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीला अजितपर्व येणार? अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
Amol Mitkari यांनी महायुती सरकारने पहिलं वर्ष पुर्ण केलं. त्यानिमित्त दुसऱ्या वर्षपूर्तीला अजित पवार मुख्यमंत्री असतील अशी प्रतिक्रिया दिली.
Amol Mitkari Sensational claim about Ajit Pawar CM Post by giving certificate of Prithviraj Chavhan statement : आज 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील महायुती सरकारने त्यांचं पहिलं वर्ष पुर्ण केलं आहे. त्यानिमित्त विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर महायुतीतील घटक पक्षाकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीला अजित पवार ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री असतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या अगोदर त्यांनी ट्विट करताना देखील अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
यावेळी बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, राज्य सरकारने वर्षपूर्ती केली आहे. त्यामध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) हे उर्जावान मंत्री म्हणून काम करतात. ते कधीही रूसून बारामतीला निघून जात नाहीत. कोणत्याही अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगांना विरोधकांच्या टीकेवर न चिडता शांततेने सामोरे जातात. तसेच राज्य सरकारला यश मिळवून देणारी लाडकी बहिण योजनेची संकल्पना देखील अजित पवार यांचीच होती.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या बँक लॉकरमधून रिव्हॉल्वरसह दागिन्यांची चोरी
त्यामुळेच मी ट्विट करताना मी दादांवर ( Ajit Pawar ) काव्य रचना केली आहे. त्यामध्ये मी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या विकासाचाआमचा निश्चयी वादा ‘महायुती’चे ‘पॉवर हाऊस’ आमचे अजितदादा… यशवंतरावांच्या स्वप्नांना महायुतीने दिली गती ‘राष्ट्रवादी’ विचारांनी समृद्ध मराठी माती “देवेंद्रपर्व”वर्षपुर्तीवर महाराष्ट्राला आहे गर्व चौफेर विकासाचं लवकरच अजितपर्व … यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेलं वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखं आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षपूर्तीपर्यंत महाराष्ट्रात नक्कीच काहीतरी वेगळ घडेल. आमच्या देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच पण लवकरच अजितपर्व महाराष्ट्रात येऊ देत. असं म्हणत मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
देशाच्या राजकारणाला धक्का देणारी मोठी बातमी सध्या समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय विषय आहे, अमेरिकेत (America) जेफ्री अॅमस्टिन नावाचा एक मोठा उद्योगपती आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने भरपूर बेकायदेशीर कारवाया केल्या. कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात राजकीय पक्षांतील नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. अमेरिकेतील सगळ्या मोठ्या नेत्यांची नावं यात आली आहेत. त्यात राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. अमेरिकेत निवडणूक आयोगाचे निकष खूप कडक आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.
अमेरिकेची संसद त्यांच्या मागं लागली असून नावं खुली करण्यास त्यांना सांगत आहे. मात्र ट्रम्प ते करत नाहीत. कारण नावं खुली केली तर अनेक लोकं अडचणीत येणार आहेत. मागच्या 6 महिन्यांपासून संसद ट्रम्प यांच्या मागे लागली आहे. यासंदर्भातली 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतली असून ही कागदपत्रं ते उघड करू शकतात. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडिओ केला असून, ते म्हणतात की, मला ती कागदं मिळतील. कागदं मिळाल्यावर या विषयावर सुब्रमण्यम स्वामी बोलतील. त्यावर आज संसदेत गदारोळ देखील होऊ शकतो. मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे. त्यातून तुम्हाला काय अर्थ काढायचाय तो काढा.
