Amol Mitkari : अजित पवार प्रकरणी मिटकरींचा युटर्न! IPS अधिकाऱ्याव केलेलं वक्तव्य घेतलं मागे…

Amol Mitkari Apologies IPS Anjana Krishna

Amol Mitkari Apologies In IPS Anjana Krishna Case : सोलापूरमधील महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये पवार अधिकाऱ्यांना झापत असल्याचं दिसत होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला. अजित पवारांवर टीकेची झोड उठली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अधिकारी नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. परंतु, नंतर अजित पवारांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली. मिटकरींनीही मागील वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

अमोल मिटकरींची भूमिका

व्हायरल क्लिपनंतर अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतला (IPS officer Anjana Krishna) होता. त्यांचा दावा होता की, आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री माहिती नसतील, तर त्यांच्या गुणवत्तेवर शंका घ्यावी लागेल. त्यांनी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. त्यांना तत्काळ निलंबित करावं, अशी मागणी पत्राद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली (Amol Mitkari) होती. या वक्तव्यामुळे मिटकरींवरही टीकेची झळ बसली. अखेर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर मिटकरींनी आपली भूमिका बदलत, ती पक्षाची नव्हे तर वैयक्तिक असल्याचं स्पष्ट (Ajit Pawar Case) केलं.

मिटकरींची दिलगिरी

सोलापूर घटनेबाबत केलेला ट्वीट मी निशर्त मागे घेतो. ही माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती. पोलीस दल आणि प्रामाणिक अधिकारी यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी पूर्ण सहमत आहे, अशी दिलगिरी मिटकरींनी व्यक्त केली.

अजित पवारांचं स्पष्टीकरण

या वादानंतर अजित पवारांनीही सोशल मीडियावरून आपली बाजू मांडली. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या क्षणी परिस्थिती बिघडू नये, शांत राहावी, याची काळजी घेत होतो. पोलीस दल आणि धैर्याने कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी राज्य आणि त्याचा कारभार महत्त्वाचा आहे. बेकायदेशीर वाळू, खडक उपसा किंवा अन्य कोणतीही बेकायदेशीर कृती असो, त्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube