IPS महिला अधिकाऱ्याला दमदाटी, व्हायरल व्हिडिओनंतर अजितदादांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा उद्देश..”

Ajit Pawar

Ajit Pawar first reaction on dispute with IPS Solapur dsp Anjali Krishna : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होतो आहे. या संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारावरून विरोधकांनी अजितदादांवर टीकेची झोड उठवली आहे. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवारांनी दमदाटी केली. यावेळी त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना फोन केला. दरम्यान, या सर्व प्रकरणावर अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं होतं ?

गावातील मुरुम उचलण्याच्या कारणावरून कुर्ड गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा (Anjali Krishna) यांच्यात शाब्दिक वाद झाला. याच दरम्यान एका कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांनाच (Ajit Pawar) फोन केला. फोन अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. मात्र त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडू अजित पवार म्हणाले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ. ये कार्रवाई बंद करो.. मेरा आदेश है.. त्यावर कृष्णा म्हणाल्या की मेरे फोनपर कॉल करें.. त्यावर अजित पवार म्हणाले तुम पर अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी.. मेरा चेहरा तो पहचानोगी ना.. असे शब्द अजितदादा रागाच्या स्वरात उच्चारताना दिसतात. त्यानंतर व्हिडिओ कॉल केला गेला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी…

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 5, 2025

अजित पवारांचं स्पष्टीकरण काय? 

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे. पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार? पुण्यातील बैठका रद्द करून अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube