मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार? पुण्यातील बैठका रद्द करून अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना

मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार? पुण्यातील बैठका रद्द करून अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना

Ajit Pawar Immediately Leaves for Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील महत्त्वाच्या बैठका रद्द करत तातडीने मुंबईकडे (Mumbai) रवाना होत सरकारकडील गंभीर प्रयत्नांना गती मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न

आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, शिंदे समिती भेटली आहे. सरकार प्रयत्न करत असते आणि समन्वयाने प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चर्चा सुरू झाली असून, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय समिती या विषयावर संवाद साधत आहे. मराठा आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केलं की, “आरक्षणाच्या या प्रश्नात मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत, असं अजिबात नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री सातत्याने चर्चेत आहेत. आंदोलन करणाऱ्यांना संविधानिक मार्गाने प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तो मान्य करतो.

‘आंदोलन केवळ राजकीय आरक्षणासाठी…’ चंद्रकांत पाटलांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

तिन्ही पक्षांचे नेते एकत्र

दरम्यान, पवार यांनी पुण्यातील नगरसेवक व प्रभाग रचनेबाबत झालेल्या तक्रारींवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले – पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रभाग बदललेले नाहीत, मात्र पुण्यात थोडा बदल झाला आहे. अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. स्वबळाचा कुठलाही नारा आम्ही दिलेला नाही, हा आमचा अंतर्गत निर्णय आहे.

कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कलाविश्वात शोककळा

यशवंत कारखान्यावरील निर्णय

अजित पवार यांनी यशवंत कारखान्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना सांगितले की, हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतल्यानंतर विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार आणि पणन विभागाकडून त्याला रीतसर परवानगी देण्यात आली आहे. या कारखान्याशी संबंधित संस्था त्या भागातील शेतकऱ्यांचीच असल्याने याबाबत गैरसमज पसरवू नये.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मराठा आरक्षणावर अजित पवार आजच मुंबईत उच्चस्तरीय चर्चेला हजर राहणार आहेत. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात आज काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube