Maratha Reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल, मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापल्यानंतर कुणबी-मराठा, मराठा-कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली. या समितीने आत्तापर्यंत दोन अहवाल सरकारकडे सादर केले आहेत. आता शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्विकारलायं. या तिसऱ्या अहवालात सापडलेल्या पुराव्यांची एकूण 54 लाख 81 हजार 400 इतकी संख्या असल्याचं समोर आलंय. या सर्व नोंदी सार्वजनिक पुराव्यामध्ये आढळून आल्या आहेत.
तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा, विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीच; आशुतोष काळेंची ग्वाही
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी सातत्याने लावून धरली. जरांगेंच्या मागणीनंतर शिंदे समितीने शोध मोहिम हाती घेत पुरावे शोधून काढले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या आधी समितीकडून दुसरा अहवाल देण्यात आला होता. हा अहवाल कॅबिनेटच्या बैठकीत मांडण्यात आला. आता हा तिसरा अहवाल स्विकारल्यानंतर मराठा आरक्षणाबााबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकही पार पडलीयं. या बैठकीस शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटलांसह इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकाची क्वालिटी का?, शालेय गणवेशावरून रोहित पवारांची टीका
23 ऑक्टोबर 2023 नंतर निर्गमित करण्यात आलेली जातप्रमाणपत्र
कुणबी – 45 हजार 856
कुणबी मराठा – 617
मराठा कुणबी – 501
सन 1986 पासून ते ऑक्टोबर 2023 पर्यंत वितरीत करण्यात आलेली प्रमाणपत्र
कुणबी – 37 लाख 43 हजार 501
कुणबी मराठा – 281
या काळात 2360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली आहेत.
देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित; वाचा, मंत्रिमंडळ बैठकीतील 38 धडाकेबाज निर्णय
दरम्यान, आत्तापर्यंत 1986 ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत 37 लाख 47 हजार 150 जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून 24 ऑक्टोबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 काळात 43 हजार 974 जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय.
अजून किती पुरावे हवेत? जरांगेंचा सवाल
राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या शिंदे समितीकडून आत्तापर्यंत अनेक पुरावे समोर आले आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरकारला अजून किती पुरावे हवे आहेत, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं.