Ajit Pawar : जगतापांचे हिंदुत्व…, यवत प्रकरणावरून अजित पवार भडकले…

Ajit Pawar : आक्षेपार्ह पोस्टमुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यांनतर हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी यवत मध्ये मोठी सभा घेतली. मात्र धार्मिक वातावरण चिघळू लागल्याने आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील चांगलेच संतापले. यातच त्यांनी यवत (Yavat) प्रकरणावरून पुन्हा एकदा आमदार संग्राम जगताप यांच्यासह पडळकर यांचे चांगलेच कान टोचले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदार जगतापांनी बदललेला अजेंडा हा अजित दादांना डोकेदुखी ठरतोय असेच चित्र निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान आणि एका तरुणाने व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर या प्रकरणाने हिंसक वळण प्राप्त झाले. दोन्ही गटाकडून थेट दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. दुकान, बेकरीतील जाळपोळ, लोकांचा नुकसान एका गटाकडून मशिदीवर दगडफेक झाली. त्यानंतर जमावाने गाड्या पेटवल्या.
हिंसाचारवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा माराही केला. यावेळी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या घरावर सुद्धा जमावाने दगडफेक केली. याच घटनेच्या विरोधात एक दिवस आधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी आक्रमक भूमिका घेत यवतमध्ये सभाही घेतली. या सभेत आक्रमक भाषणे देखील झाली व त्यानंतर पुन्हा जमावामध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भगवी शाल धारण केल्याचे विरोधक म्हणत आहे. एका विशिष्ट धार्मिक समुदायाबाबत आमदार जगतापांनी असलेली भूमिका यावर अजित पवार यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली.
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणार आपला पक्ष आहे, सर्वधर्म समभावाची भावना मनामध्ये ठेऊन लोकप्रतिनिधींनी कामे करावे असे वारंवार अजित पवार यांनी आपल्या भाषणांमध्ये बोलून देखील दाखवले आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाची काही ध्येय धोरणे आहे. याला तडा जाऊ नये यासाठी पवार हे नेहमी आपल्या लोकप्रतिनिधींचे कान टोचण्याचे काम वेळोवेळी करत असतात. यातच याच मुद्द्यावरून पवार यांनी काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांना देखील बोलले होते.
दरम्यान नुकतेच एका भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, डोक्यात येडा असलेल्या एक माणसाने काहीतरी स्टेट्स ठेवली मात्र त्याला अटक करण्यात आली. सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्यांची आपण आदर केला पाहिजे हि भारताची संस्कृती आहे. त्यानंतर त्याठिकाणी दोन आमदारांनी ( गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप) भाषणे केली.
शेकापचा मंच, मराठीचा मुद्दा, फडणवीसांवर तुटून पडले राज ठाकरे!
आम्ही लोकप्रतिनिधी लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून बोलत असताना शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारापासून आपण बाजूला जात कामा नये हि गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे अशा शब्दात एक प्रकारे अजित पवार यांनी पुन्हा एकदा आमदारांची काणे टोचली. तसेच कोणी कोणाला भडकवण्याचा प्रयत्न केला तरी तुमहु भडकावून जाऊ नका असा सल्लाही पवार यांनी नागरिकांना दिला.