आयटीवाल्यांची भूमिका ते शांतपणे ऐकतात.., हिंजवडी सरपंचांचा उपमुखमंत्री अजित पवारांवर थेट घाव

आयटीवाल्यांची भूमिका ते शांतपणे ऐकतात.., हिंजवडी सरपंचांचा उपमुखमंत्री अजित पवारांवर थेट घाव

Sarpanch Ganesh Jambhulkar on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच हिंजवडीत गेले होते. (Ajit Pawar) त्यावेळी त्यांनी येथील सरपचांना चांगलच झापलं होतं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सरपंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अजित पवार त्यांच्यावर रागावले होते. हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभुळकर यांचं नेमकं म्हणणं काय होतं त्यावेळी समोर आलं नाही. पण आता सरपंचांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप केलेतं.

माझी गावची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. हिंजवडी, माण आणि सात गाव मिळून एक स्वतंत्र नगरपालिका होऊ द्या. आमची ग्रामपंचायत काम करायला सक्षम आहे. पिंपरीमध्ये जायची काही गरज नाही, तिकडं अजुनही रस्ते खराब असून मोठी गर्दी आहे. त्यामुळे आमच्या गावाचं म्हणणं आहे आहे की स्वतंत्र नगरपालिका पाहिजे. ती झाल्यावर आम्ही आमचा विकास स्वत: करू, अशी मागणी सरपंच गणेश जांभुळकरांनी केली.

Video : मला जे करायचय ते मी करतो; उपमुख्यमंत्री अजित पवार हिंजवडीच्या सरपंचावर भडकले

यावेळी अजित पवार आले तो त्यांचा दुसरा राऊंड होता, पहिल्यावेळीही आम्हाला आमंत्रण नव्हतं. ग्रामपंचायतलाही काही पत्र नव्हतं. आम्हाला समजलं की अजित दादा येणार आहेत. आम्ही गावाची भूमिका मांडायला तिथे साडेपाच वाजल्यापासून बसलो होतो. मात्र, अजित पवार आयटीवाल्यांचं ऐकतात पण आमचं काही ऐकत नाहीत अशी थेट नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आयटीवाल्यांची भूमिका ते शांतपणे ऐकतात पण आमचं काही ऐकत नाहीत. आम्ही गेलो की त्यांची एकच भूमिका असते तुम्ही गप्प बसा, आम्ही सांगेल ते ऐका काम होणारच.

अहो असू द्या, असू द्या हो साहेब, धरणं करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं, माझ्या पुण्यातून-महाराष्ट्रातून हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर- हैदराबादला बाहेर चाललं. तुम्हाला काय पडलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत, हे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube