Ajit Pawar Vs Sharad Pawar: ‘अजितदादां’कडे आमदार-खासदारांचा ओढा, काकांची मात्र कसोटी ?

Ajit Pawar Vs Sharad Pawar: सध्या राज्यात महायुती सरकारमधील काही कुरबुरी वगळता त्याचं चागलं चाललं आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीतील माजी आमदार, पदाधिकारी हे पक्ष सोडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतलीय. तसे पत्रच त्यांनी शरद पवार यांना दिल्याचे बोलले जात आहे. या आमदारांच्या या दबावतंत्रामुळे शरद पवारांमुळे पुन्हा धक्का बसू शकतो. अजितदादांबरोबर निघालेले ते आमदार कोण आहेत ? खासदार काय निर्णय घेतील, याबाबत या व्हिडिओतून जाणून घेऊया….
भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका
गेल्या काही दिवसांपासू दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. दोन राष्ट्रवादी पक्ष झाले असले तरी त्यांच्या कुटुंबात मात्र कटुता आलेले नाही. त्याचे उदाहरण हे ताजे आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा समारंभात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेले. खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार हेही आवर्जुन उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकीय कटुता संपल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला, रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोघे एकत्र आले. दोघांमध्ये बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे. त्याचच आता शरद पवार गटातील दहापैकी सहा आमदारांनी आपण अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशी थेट भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. तशा मागणीच्या स्वाक्षरीचे पत्रच या आमदारांनी पवारांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आमदारांनी अजित पवारांशी जवळीकही वाढविली आहेत. त्याची कारणेही वेगळे आहेत. स्वताःच्या मतदारसंघाचे कामे करून घेणे, सत्ताधारी पक्षाबरोबर राहिल्यास निधीही जास्त मिळते. तसेच साखर कारखाने असलेल्या आमदारांना फायदा होतो.
माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ…करुणा शर्मांचा आणखी एक खळबळजनक आरोप, प्रकरण नेमकं काय?
कोणते आमदार अजितदादांबरोबर जावू शकतात ?
तसं पाहिलं तर शरद पवार गटातील अजितदादांविरोधात कायमच आक्रमक राहिलेले जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, जयंत पाटील हे अजितदादांबरोबर जाऊ शकत नाहीत. वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, बीडचे संदीप क्षीरसागर, माळशिरसचे उत्तमराव जानकर, मोहोळचे राजू खरे, माढाचे अभिजित पाटील हे अजितदादांसोबत जाऊ शकतात. त्यात नारायण पाटील, अभिजित पाटील यांचे साखर कारखाने आहेत.
कोणते खासदार गळाला लागतील ?
तशी केंद्रात अजितदादांची ताकद नाही. सुनील तटकरे हे एकच खासदार आहेततच. या परिस्थितीत ते केंद्रात आपले वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मध्यंतरी शरद पवार गटाचे आठपैकी सात खासदार हे अजितदादांबरोबर जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. केंद्रात राजकीय वजन वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार गटातील खासदारांना गळ घालू शकतात. त्या बदल्यात केंद्रात ते मंत्रिपद मिळू शकतात. अशा परिस्थितीत पूर्वी अजितदादांबरोबर चांगले संबंध असलेले शिरुरचे अमोल कोल्हे, भिवंडीचे बाळ्यामामा म्हात्रे, बीडचे बजरंग सोनवणे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील हे अजितदादांबरोबर जाऊ शकतात. काही खासदार अजितदादांबरोबर जात असतील तर दिंडोरीचे भास्कर भगरे, वर्धाचे अमर काळे हेही अजितदादांची साथ देऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर थेट टीका केली. निवडणुकीनंतर मात्र त्या अजितदादांवर थेट टीका न करता त्यांच्या कामाचे कौतुक केले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या सात खासदारांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यास सुप्रिया सुळे याही त्यांच्याबरोबर जाऊही शकतात, असे बोलले जाते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीतील काही बोलघेवडे प्रवक्ते करतात. पण अजितदादा तसे अजिबात करणार नाहीत. उलट भाजपशी जुळवून घेऊन पुढची पाच वर्ष सत्तेत घालविण्यात त्यांना अधिक रस आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि राज्यातील भाजप नेते यांचे सूर बिघडलेले दिसतात. त्या उलट अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमधील जवळीक आणखी घट्ट झाली आहे. दुसरीकडे शरद पवार यांना आता आपल्या राजकीय विश्वासर्हतेवर कोणतीही तडजोड करायची नाही. आयुष्याच्या या टप्प्यात सत्तेसाठी भाजपबरोबर गेलो, ही टीका त्यांना लावून घ्यायची नाही. त्यामुळे ते अजितदादांसोबत अधिकृतरित्या मनोमिलन करणार नाहीत. पण ते सोडून इतर नेते, खासदार आणि आमदार हे अजिदादांशी जुळवून घेतील हे आता उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात अजितदादा हेच पक्षाचे प्रमुख असतील, अशी खूणगाठ शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील बांधलीय.
त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील नेते हे अधिकृतरित्या तुतारीचे असतील. पण त्यांच्या हातावर घड्याळ हे बांधले गेले आहे, हे उघड गुपित आहे.