Sharad Pawar : 3 लाखांपर्यंत कर्जमाफ, शरद पवारांनी दिली शेतकऱ्यांना गॅरंटी
Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून आज मुंबईतली बीकेसी मैदानात (BKC Ground) एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना महायुती सरकारवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही माविआची ताकद दाखवून दिली. आता विधानसभेची निवडणूक आहे आणि हे राज्य कसा चालणार याचा निकाल देण्याची ही वेळ आली आहे.
महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात महत्वाचा राज्य आहे. आज राज्यातून उद्योग गुजरातमध्ये जात आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. तसेच राज्यात भ्रष्टाचार वाढत आहे आणि या भ्रष्टाचारामुळे सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आले तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार आणि राज्यात कृषी समृद्धी योजना (Krishi Samriddhi Yojana) लागू करणार अशी घोषणा शरद पवार यांनी केली. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. असं शरद पवार म्हणाले.
तर दुसरीकडे या सभेत बोलताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपकडून संविधान संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला तसेच जर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आले तर आम्ही महालक्ष्मी योजना (Mahalakshmi Yojana) लागू करणार अशी घोषणा त्यांनी केली.
संग्राम जगतापांना भाजपकडून समर्थन, आगरकर म्हणाले विजयी भव…
या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार असल्याची ग्वाही देखील लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.