संग्राम जगतापांना भाजपकडून समर्थन, आगरकर म्हणाले विजयी भव…
Sangram Jagtap : राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे आहेत. त्यानुसारच काम करून निर्णय घेण्यात येतात. त्यानुसार आजपासून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना शहर भाजपचे (BJP) अधिकृतरीत्या समर्थन देण्यात येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत निस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे काम करून उमेदवार आ.जगतापांच्या मागे उभे राहून त्यांच्या विजयासाठी योगदान द्यावे. महायुतीमधील घटक पक्षांना बरोबर घेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम व किल्विश न ठेवता जासतीत जास्त प्रचार व काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत शहर भारतीय जनता पार्टीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत जाहीर केला. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, विधानसभा निवडणूक प्रमुख व महायुतीचे समन्वयक महेंद्र गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस महेश नामदे, प्रदेश सदस्या सुरेखा विद्ये, महिला आघाडी प्रमुख प्रिया जानवे, सविता कोटा, पंडित वाघमारे, बाळासाहेब भुजबळ, मयूर बोचूघोळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भारत माता की जय…, जय श्रीराम…, भारतीय जनता पार्टीचा विजय असो…, अशा घोषणा देत बैठकीत उमेदवार आ.संग्राम जगताप यांचा शहर भाजपच्या वतीने सत्कार करून विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले, भारतीय जनता पार्टीने मला समर्थन देण्याचे जाहीर केल्याबद्दल मी अंत:करणातून आभार व्यक्त करतो. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असून नगर जिल्ह्यातही सर्वत जास्त महायुतुचेच उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. आता मतदानासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत. या दिवसात सर्वांनी आपापले योगदान देऊन जास्तीत जास्त प्रचार करावा. मझ्या विजयात मोठा सिंहाचा वाटा भाजपचा असेल. या निवडणुकीत काही मंडळी मुद्दाम अपप्रचार करत संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांच्या अफवांना बळी न पडता नागरिकांमध्ये जागृती करा. भाजप हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा भाऊ आहे.
सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचा फॅमिली एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म “ड्रीमियाता ड्रामा” लाँच
या निवडणुकीत भाजपने मोठ्या भावाप्रमाणे मदत करावी. मीही छोट्या भावा सारखा तुमच्या बरोबर राहील. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी मला पुन्हा संधी द्यावी. असं संग्राम जगताप म्हणाले.