महालक्ष्मी रेसकोर्स बिल्डरच्या हवाली होणार? शिंदे सरकारच्या तीन निर्णयांनंतर आदित्य ठाकरे मैदानात
मुंबई : येथील महालक्ष्मी रेसकोर्सबाबत शिंदे सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांनंतर वाद पेटला आहे. या दोन्ही निर्णयांना विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. या निर्णयांवरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला, सोबतच या निर्णयांना भाजपचे समर्थन आहे की विरोध याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही दिले आहे. (MLA Aditya Thackeray opposed the three decisions taken by the Shinde government regarding Mahalakshmi Race Course)
आदित्य ठाकरे म्हणाले, रेसकोर्सवर सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे, शिवाय अंडरग्राऊंड कार पार्किंग केले जात आहे. इथे 100 कोटी खर्चून सुटाबुटातील लोकांच्या घोड्यांसाठी तबेला बांधला जात आहे. तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना झोपडपट्टी म्हणून घोषित केले आहे. त्यांना एसआरएमध्ये सामावून घेऊन असे सांगितले आहे. पण हे सगळे नेमके कोणत्या बिल्डरसाठी सुरु आहे? मुंबईचे पालिका आयुक्त आणि प्रशासक मुंबई लुटत आहेत.
सहा तासांचे ऑपरेशन, सहा गोळ्या बाहेर काढल्या… : महेश गायकवाडांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती
मुंबईच्या रेसकोर्सवर हजारो मुंबईकर चालायला येतात, धावायला येतात, योगा करायला जातात. तिथे हास्य क्लब आहे, ब्लाईंड क्लब आहे. तसेच अनेक कार्यक्रम तिथे होतात. मुंबईकरांना खुली असलेली ही एकमेव जागा आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र आहेत, ते सेंट्रल पार्क करू असे सांगत आहेत. शिवाय अंडरग्राऊंड कार पार्किंग बनवत आहेत. पण त्याचच समोर आपण कोस्टल रोडजवळ दोन हजार गाड्यांसाठीचे कार पार्किंग बनवत आहोत. मग हे अंडरग्राऊंड कार पार्किंग कोणासाठी?
याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांसाठी तबेला बांधून दिला जाणार आहे. कोणत्याही खर्चासाठी टेंडर काढावे लागते. पण महापालिका यासाठी टेंडर न काढताच 100 कोटी खर्च करणार आहे. हे घोडे पोलिसांचे नाही किंवा सैन्याचे नाहीत. हे घोडे सुटा बुटतील लोकांचे म्हणजेच गॅम्बिंलिंगवाल्यांचे आहेत. हे सरकार त्यांना तबेले बांधून देणार आहे. पण मग जनतेचा पैसा का वापरला जात आहे? भाजपने रेसकोर्सबाबत समर्थन आहे की विरोध याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी.
मृत्यूची खोटी बातमी पूनम पांडेला भोवणार! कायदेशीर कारवाईची सत्यजीत तांबेची मागणी
आयुक्तांवर हल्लाबोल :
आताचे जे मुंबई पालिकेचे आयुक्त आणि प्रशासक दिल्लीला प्रतिनियुक्तीवर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. किंवा येत्या काही दिवसात राज्याचे मुख्य सचिव होण्याची स्वप्न बघत आहेत. उद्या जर हे मुख्य सचिव झाले तर जशी मुंबई लुटली तसे राज्य लुटतील, दिल्लीला गेले तर दिल्ली लुटली, असाही हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांच्यावर केला.
कोस्टल रोड ठाकरेंचे स्वप्न :
कोस्टल रोड हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आहे. हा कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला. महाविकास आघाडीचे सरकार असते तर डिसेंबर 2023 त्याचे कामही पूर्ण झाले असते. पण आता त्याच कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरु आहे. ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत आहे, असा हल्लाबोलही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.