सहा तासांचे ऑपरेशन, सहा गोळ्या बाहेर काढल्या… : महेश गायकवाडांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि राहुल पाटील (Rahul Patil) या दोघांच्याही प्रकृतीबाबत ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तासांच्या ऑपरेशननंतर सहा गोळ्या बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरती ठेवण्यात आले आहे. तर राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (doctors of Thane’s Jupiter Hospital have given information about the condition of both Mahesh Gaikwad and Rahul Patil.)
उल्हासनगरच्या द्वारली गावातील 50 एकर जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिललाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोघांतील वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली.
गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार
यानंतर महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून सर्वांना स्थानिक न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी शिंदे म्हणाले, झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतून बचावलेले महेश गायकवाड लवकरात लवकर बरे व्हावेत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मृत्यूची खोटी बातमी पूनम पांडेला भोवणार! कायदेशीर कारवाईची सत्यजीत तांबेची मागणी
कडक कारवाई करणार : फडणवीस
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारामागे काय सत्य आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.